Dainik Gomantak
गोवा

Fatorda Stadium Leak: 'आनी हेंका रोनाल्डो जाय', ऐन सामन्यात फातोर्डा स्टेडियमला गळती, गोव्याच्या फुटबॉल उत्सवाला गालबोट; Watch Video

Fatorda Stadium leak Goa: हा सामना 'हाय प्रोफाईल' ठरणार असे चित्र उभे राहिले मात्र पावसाने फातोर्डा मैदानात चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरले.

Akshata Chhatre

मडगाव: एफसी गोवा आणि सौदी अरबचा बलाढ्य क्लब अल नस्सर एफसी यांच्यातील एएफसी चॅम्पियन्स लीगचा महत्त्वपूर्ण सामना गोव्यातील फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला गेला. पोर्तुगालचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो या सामन्यासाठी भारतात येणार असल्याची जोरदार हवा आयोजकांनी प्रारंभी निर्माण केली होती. हा सामना 'हाय प्रोफाईल' ठरणार, असे चित्र उभे राहिले, मात्र पावसाने फातोर्डा मैदानात चाहत्यांच्या आनंदावर पाणी फेरले.

स्टेडियमच्या दुरवस्थेमुळे मोठी चिंता

या मोठ्या सामन्यापूर्वी फातोर्डा स्टेडियमची झालेली दुरवस्था अधिक चिंतेचा विषय ठरली. जोरदार पावसामुळे सामन्याच्या अगदी आधी स्टेडियमच्या काही भागांतून गळती सुरू झाली. खेळाच्या इतक्या मोठ्या स्तरावर, विशेषतः आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेडियमची ही स्थिती पाहून चाहते आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मैदानाची ही दुरवस्था गोवा आणि भारतीय फुटबॉलसाठी नक्कीच भूषणावह नाही. आयोजकांनी तातडीने यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

या सामन्यात रोनाल्डो अखेरीस आला नाहीच आणि या सामन्याची तिकीट दरही प्रचंड महागडे ठेवण्यात आले होते. परिणामी, रोनाल्डोला पाहण्याची संधी हुकल्याने आणि तिकिटांच्या दरामुळे अनेक फुटबॉलप्रेमींनी मैदानावर येण्याऐवजी घरी टीव्हीवर सामना पाहणे पसंत केले. यामुळे आयोजकांच्या अपेक्षांना काही प्रमाणात धक्का बसला.

अल नस्सरची आक्रमक सुरुवात

सामन्यात, सौदी अरबच्या अल नस्सर संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत एफसी गोव्याला बचावात्मक ठेवले. सामन्याच्या अवघ्या १० व्या मिनिटाला ॲन्जेलो गॅब्रिएल याने गोल करत पाहुण्या संघाला आघाडी मिळवून दिली. एफसी गोवाच्या खेळाडूंनी कडवा प्रतिकार केला, पण अल नस्सरचा अनुभव आणि आक्रमकता वरचढ ठरली. स्थानिक ब्रिसन फर्नांडिसने गोल करून एफसी गोवाला दिलासा दिला, पण अखेरीस २-१ अशा फरकाने गोव्याला पराभव पत्करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT