Fatorda Stadium: स्टेडियमसाठी जागा दिलेल्यांना मिळणार घराची मालकी, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; विजय सरदेसाईंनी घडवून आणली कुटुंबीयांची भेट

fatorda stadium land owners: फातोर्डा येथे स्टेडियम बांधला गेला तेव्हा तिथे जी कुटुंबे राहत होती त्यांना दुसरीकडे जागा दिली होती.
pramod sawant housing promise
pramod sawant housing promiseDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: फातोर्डा येथे स्टेडियम बांधला गेला तेव्हा तिथे जी कुटुंबे राहत होती त्यांना दुसरीकडे जागा दिली होती, परंतु ३९ वर्षांपूर्वी ज्या दुसऱ्या जागेमध्ये त्यांनी घरे बांधली त्यांचा मालकी हक्क अजून त्यांना मिळालेला नाही. या कुटुंबातील प्रतिनिधींची काल फातोर्डा स्टेडियमवर आल्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आमदार विजय सरदेसाई यांनी भेट घडवून आणली.

त्यावेळी या कुटुंबातील प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडली. त्यांची घरे नियमित करून त्यांना मालकी हक्क देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या कुटुंबाच्या भावना सरकारला पूर्ण माहीत आहे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

pramod sawant housing promise
Tiger Reserve Goa: समिती करणार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पाहणी, गुरूवारी सचिवालयात होणार संबंधित घटकांशी चर्चा

कित्येक एसटी कुटुंबांनी फुटबॉल स्टेडियमसाठी आपल्या जमिनीचा त्याग केला होता. या कुटुंबांना ‘म्हजे घर’ योजने अंतर्गत मालकी हक्क देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी संबंधित खात्यांना कागदपत्रे तयार करून त्यांच्या घरांचा मालकी हक्क देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला आहे.

pramod sawant housing promise
Goa Tiger Reserve: 1 लाख विस्थापनाचा आकडा सिद्ध करणारी फाईलच गायब! वाघांचे आणि स्थानिकांचे भविष्य..

सरदेसाईंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, सरकारने या कुटुंबांना त्यांचा हक्क देणे भाग आहे. त्यांच्या त्याग व सहकार्यामुळेच हे स्टेडियम विक्रमी वेळेत बांधणे शक्य झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिल्याने आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com