Pramod Naik Dainik Gomantak
गोवा

फातोर्डा भाजप मंडळ समितीतून प्रमोद व मंदार यांना हटविले

दैनिक गोमन्तक

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्या व्यासपीठावर चढून त्यांची स्तुती केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या फातोर्डा मंडळ कार्यकारणीचे दोन्ही सरचिटणीस प्रमोद नाईक (Pramod Naik) व मंदार सावर्डेकर (Mandar Savardekar) यांची मंडळ समितीवरून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्याजागी वल्लभदास रायकर (Vallabhdas Raikar) व दिलीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या गोष्टीला भाजपचे प्रदेश अध्यक्ष (BJP state president) सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनीही दुजोरा दिला. नाईक व सावर्डेकर यांच्या विरोधात राज्य कार्यकारिणीकडे स्थानिक मंडळाने तक्रार केली होती. या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने त्यांना कार्यकारिणीतून काढून टॅकण्याचे अधिकार स्थानिक मंडळाला दिले होते, त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असावा अशी माहिती तानावडे यांनी दिली.

दरम्यान अशी कारवाई करण्यात आल्याची आपल्याला कोणतीही कल्पना दिलेली नाही. किंवा कुणी आपल्याकडे स्पष्टीकरणही कधी मगितलेले नाही असा खुलासा प्रमोद नाईक यांनी केला. आमच्यावर जर कारवाई केली असती तर त्यासाठी मंडळाची बैठक होणे आवश्यक होते. मात्र मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर हे सध्या आजारी असून इस्पितळात आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत कुणी बैठक घेतली असा सवाल त्यांनी केला. आमच्या हकालपट्टीचा निर्णय मंडळाने नव्हे तर दामू नाईक यांनी वैयक्तीक आकसापोटी घेतला असावा अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

विजय सरदेसाई यांनी दिवाळीच्या पूर्वरात्री आयोजित केलेल्या श्रीकृष्ण विजयोत्सव कार्यक्रमाच्यावेळी नाईक व सावर्डेकर हे सरदेसाई यांच्या व्यासपीठावर चढले होते. यावेळी नाईक यांनी सरदेसाई यांच्या कामाचे कौतूक करताना, सरदेसाई हे काम करून दाखविण्याची धमक असलेले आमदार असे म्हटले होते.

या संदर्भात नाईक यांना विचारले असता, सरदेसाई यांचा कार्यक्रम राजकीय स्वरूपाचा नव्हता तर तो सांस्कृतिक कार्यक्रम होता. दामबाबांचे भक्त या गटाचा प्रतिनिधी म्हणून आम्ही दोघे त्या व्यासपीठावर उपास्थित होतो. रवींद्र भवन सर्कलला श्री दामोदराचे नाव द्यावे ही मागणी घेऊन आम्ही यापूर्वी सरदेसाई यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आमची मागणी मान्य केली होती. त्यामुळेच मी सरदेसाई हे तत्परतेने काम करणारे आमदार असे म्हटले होते. त्यात पक्षविरोधी असे काहीच नव्हते असे नाईक म्हणाले.

तानावडे यांना विचारले असता, विरोधी आमदाराच्या व्यासपीठावर चढून स्तुती करणे ही पक्षविरोधीच कृती असून त्यामुळेच त्या दोघांवर करण्यात आलेली कारवाई योग्य अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, या कारवाईनंतर सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते त्या दिलीप नाईक यांना विचारले असता, फातोर्डा मंडळाच्या सरचिटणीसपदी आपली दोन महिण्यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती अशी माहिती दिली. पालिका निवडणुकीनंतर लगेच आपल्याकडे या पदाचा ताबा दिला होता. मागचे दोन महिने मी मंडळाचा सरचिटणीस म्हणून काम पाहतो असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT