Vijai Sardesai journalist remark Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly:‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Goa Assembly viral video: मिश्किल शैलीत सरदेसाई यांनी मी पत्रकार असतो तर... काही रोखठोक विधानं करत राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले

Akshata Chhatre

Vijai Sardesai Assembly Remark: विधानसभा अधिवेशनात नेहमीच वेगवेगळे मुद्दे गाजतात. विरोधक आणि सत्ताधारी सरकारवर या ना त्या कारणाने तलवार रोखतात. राज्याचे अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असतानाच फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई पुन्हा एकदा त्यांच्या मजेशीर विधानामुळे चर्चेत आले. सरदेसाई यांनी विधानसभेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली. नेहमीप्रमाणेच आपल्या मिश्किल शैलीत सरदेसाई यांनी मी पत्रकार असतो तर... काही रोखठोक विधानं करत राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले.

‘मी पत्रकार असतो तर...’

यावेळी, 'मी आमदार नसतो तर नक्कीच पत्रकार झालो असतो,' असे सांगत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. पुढे ते म्हणाले, 'मला मनासारखं लिहिता आलं नसतं, त्यामुळे मला कोणी नोकरी दिली असती की नाही हे माहीत नाही.' पत्रकारांनी आता आपली जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आल्याचे सांगत, 'आवश्यक असल्यास मी मदतीसाठी तयार आहे,' असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षाची भूमिकाही विनोदी पद्धतीने मांडली. सध्या सरदेसाई यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

बेकायदेशीर घडामोडींवरून सरकारवर टीका

राज्यात सुरू असलेल्या अनेक बेकायदेशीर घडामोडींवर ते बोलत होते. विशेषतः कॅसिनोमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर म्हणावी तशी कारवाई होत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर थेट आरोप करत म्हटले की, 'मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील अनेक महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत, कारण त्यांना त्यांच्या 'अडॉपटेड आमदारांवर' विश्वास नाहीये.' हे विधान करून त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

'सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार?'

आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचे उदाहरण दिले. 'एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा उपचारादरम्यान इस्पितळात मृत्यू झाला, पण अजूनही गुन्हा नोंदवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. जर एका पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळत नसेल, तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाने प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Candolim Casino Raid: कांदोळीत कॅसिनोवर पोलिसांचा छापा, 'अंदर-बाहर' जुगार खेळताना 11 जणांना रंगेहाथ पकडलं

Goa: राज्‍यात तब्बल 1,14,840 पाळीव आणि मोकाट कुत्रे! 9,459 भटकी गुरे; पशुसंवर्धन खात्याची माहिती

Trump Tariffs India: ट्रम्प यांचा पुन्हा भारताला धक्का, आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची केली घोषणा

Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

Sunburn Festival 2025: यंदा 'सनबर्न' मुंबईत, पण आमदार मायकल लोबो गोव्यासाठी आग्रही

SCROLL FOR NEXT