Fatorda  Dainik Gomantak
गोवा

Fatorda News : मासळीचा कचरा, सांडपाणी शेतात; कारवाईची गरज

Fatorda News : मडगावच्या होलसेल मासळी मार्केटमधील प्रकार

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda News :

फातोर्डा, मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात स्वच्छता राखण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असूनही या मार्केटमधील सांडपाणी व कचरा जवळ असलेल्या मोकळ्या शेतात सोडला जात आहे.

यामुळे हा परिसर गलिच्छ झाला असून दुर्गंधीही पसरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

घाऊक मासळी बाजारात अनेक वेळा मासळीचा कचरा दुर्लक्षित राहतो त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मासे कापता होणारे सांडपाणी जवळच्या शेतात सोडले जाते.

काही महिन्यांपूर्वी घाऊक मासळी बाजारातील अस्वच्छतेबाबत उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने यंत्रणा बसविण्याचे प्रयत्न करूनही या बाजारपेठेत अस्वच्छ परिस्थिती कायम आहे.

यापूर्वी एसजीपीडीएने मासे कापणाऱ्यांना सक्त ताकीद देऊन मार्केटमध्ये स्वच्छता राखण्याविषयी सूचित केले होते. तरी स्थितीत काही बदल झालेला नाही. या प्रकाराला माडेल रहिवाशांनी जोरदार आक्षेप घेतला होता.

साळ नदीही होेते प्रदूषित

होलसेल मासळी मार्केटमध्ये मासळी कापणारे कामगार सांडपाणी उघड्यावर सोडून देत आहेत. हे पाणी नंतर जवळच्या शेतात जाते. त्यानंतर साळ नदी प्रदूषित होत असते.

हे घाणीचे पाणी शेतात गेल्यानंतर व साचून राहिल्याने माझा प्रभाग असलेल्या माडेल परिसरात दुर्गंधी पसरत असते ती असह्य अशी असते. नगरपालिका, पोलिस या कामगारांवर कारवाई करीत असले तरी ती तात्पुरत्या काळासाठी असते. या विषयी ठोस कारवाई होणे गरजेचे आहे.

नियमित देखरेख हवी

काही नागरिकांनी सांगितले की, मासे कापण्याच्या कामामुळे अस्वच्छ स्थिती निर्माण होत आहे. घाऊक मासळी बाजारातील कामांवर नियमितपणे देखरेख न ठेवल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा कृती आराखडा व्यर्थ जाईल.

मार्केटची साफसफाई केली जाते यात शंका नाही, तथापि मार्केट व आजूबाजूला होणाऱ्या बेकायदेशीर कारवायांवरही कडक कारवाई करण्याची गरज आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

मी नियमितपणे बाजाराला भेट देतो. बाजारात मासळीचा कचरा पडून राहत असल्याचे पाहिलेले आहे. त्यामुळे येथे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होत आहे. या प्रकारची कृती रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कठोर प्रयत्न करूनही सांडपाणी शेतात सोडले जाते.

- मिनीन ज्योस, फातोर्डा

घाऊक मासळी बाजारातील मासे कापणाऱ्या कामगारांच्या प्रक्रियेवर कडक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे कामगार मासळीचे अस्वच्छ पाणी जवळील शेतात सोडून साळ नदी प्रदूषित करणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.

- अॅंड्रयू फर्नांडिस, रहिवासी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT