GOMACO Hospital Dainik Gomantak
गोवा

लय अवघड गड्या उमगाया बाप रं...! वडिलांनी मूत्रपिंड देऊन मुलाला दिलं नवजीवन; ‘गोमेकॉ’त यशस्वी शस्त्रक्रिया

GOMACO Hospital: सत्तरी येथील श्रीकांत गावकर (51) यांनी नुकतेच त्यांचा मुलगा सोमदत्त (21) याला मूत्रपिंड दान करुन नवजीवन दिले.

Manish Jadhav

सत्तरी येथील श्रीकांत गावकर (51) यांनी नुकतेच त्यांचा मुलगा सोमदत्त (21) याला मूत्रपिंड दान करुन नवजीवन दिले. सोमदत्त, इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग, बांबोळीला द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आहे.

नेफ्रेक्टॉमी (मूत्रपिंड काढणे) आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या दोन्ही शस्त्रक्रिया ‘गोमेकॉ’ येथे 29 जून रोजी करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया 6 तास चालल्या.

डॉ. जे.पी. तिवारी, डॉ. मधुमोहन प्रभुदेसाई आणि डॉ. शर्ली डिसोझा यांच्या नेतृत्त्वाखाली नेफ्रोलॉजी, यूरॉलॉजी आणि ॲनेस्थेसिया या विभागांनी शस्त्रक्रिया केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमदत्तला स्टेज 5 सीकेडी (क्रॉनिक किडनी डिसीज) अर्थात जुनाट मूत्रपिंड विकार झाल्याचे निदान झाल्यानंतर आठवड्यातून तीन वेळा डायलेसीस करावे लागायचे. तरुणामध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती आणि तो तंदुरुस्त मुलगा होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

सुमारे सहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेचे उत्कृष्ट परिणाम दिसून आले. रुग्णाचे (Patient) मूत्रपिंड पहिल्याच दिवसापासून कार्य करू लागले. शस्त्रक्रियेनंतर वडील आणि मुलगा दोघेही पूर्ण आहार घेत असून बरे होत आहेत. ही मूत्रपिंड दानाची प्रक्रिया गोमेकॉत पूर्णपणे मोफत पार पडली.

गोमेकॉ ही स्वतःची इनहाऊस एचएलए इम्युनोलॉजी लॅब असलेल्या मोजक्या सरकारी रुग्णालयांपैकी एक आहे. जिथे एखाद्याला काही तासांत माहिती मिळू शकते, की ठेवलेले मूत्रपिंड संभाव्य प्राप्तकर्त्याशी जुळते की नाही.

प्रत्यारोपणाच्या यशासाठी हा ‘एचएलए’ विरुद्ध जुळवणी महत्त्वाची असते. सोमदत्त आणि त्याच्या वडिलांना सखोल निरीक्षण आणि उपचारांसाठी ट्रान्सप्लांट वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे देवदूतच

वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Vishwajit Rane) हे सत्तरी व राज्यासाठी देवदूतच असून सत्तरीवासीयांना कोणत्याही प्रकारची करमतरता ते भासू देत नाहीत. सुदत्तवर एवढी मोठी शस्त्रक्रिया व उपचार तेही मोफत. हे आरोग्यमंत्र्यांमुळेच शक्य झाले आहे, असे सांगून सोमदत्त यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT