Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: किळसवाणा प्रकार! पोटच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार; गोवा खंडपीठाचा नराधम बापाला दणका, उलटतपासणीचा अर्ज फेटाळला

Goa Crime News: आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका बापाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठा दणका दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका बापाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. पीडित मुलगी आणि इतर साक्षीदारांची पुन्हा उलटतपासणी करण्यासाठी त्यांना न्यायालयात बोलवावे, हा आरोपीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

‘न्याय्य सुनावणीचा अधिकार केवळ आरोपीलाच नाही, तर पीडितेला आणि साक्षीदारांनाही आहे,” असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणात आरोपीवर भारतीय दंड संहिता, गोवा बाल कायदा २००३ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पीडित मुलगी ही अवघी १३ वर्षांची असून, आरोपी तिचा स्वतःचा पिता आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने साक्षीदारांना पुन्हा बोलावण्याचा आरोपीचा अर्ज फेटाळला होता. त्या आदेशाला आरोपीने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३४८ अंतर्गत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, पूर्वीच्या वकिलांनी योग्य प्रकारे उलटतपासणी केली नाही आणि काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले नाहीत. त्यामुळे पुन्हा साक्ष नोंदवली नाही, तर आरोपीवर अन्याय होईल.

मात्र, सरकारी आणि पीडितेच्या वकिलांनी या युक्तिवादाला जोरदार विरोध केला. पोक्सो कायद्यांतर्गत पीडित बालकाला वारंवार न्यायालयात बोलावणे हे तिच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरेल, तसेच हा केवळ खटला लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT