Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: कारची बसला धडक, कर्नाटकचा चालक ठार, पाचजण जखमी

Fatal Accident Goa: जखमींना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर मडगाव येथील जिल्हा इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Fatal Accident Goa

माशे येथे मडगाव- कारवार महामार्गावर कदंबा बस व कारमध्ये आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास अपघात होऊन कार चालकाचे अपघात स्थळी निधन झाले तर अन्य पाच प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघात एवढा भीषण होता, की कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा होऊन कारचालक राजेश वेर्णेकर (वय ४९) यांचे निधन झाले.

तर कारमधील प्रवासी अंजली वेर्णेकर (वय ४९), रामदास वेर्णेकर (वय २९), करिष्मा वेर्णेकर (वय५५), अनुषा वेर्णेकर (वय २१), द्विंकल कोलवेकर (वय १८) या पाच प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. वेर्णेकर कुटुंबीय कारवार येथून जीए ०५ बी ४७२१ कारने फोंडा येथे जात होते, तर जीए ०८ व्ही ५०७२ ही कदंब प्रवासी बस मडगावहून कारवारला जात होती.

स्थानिकांनी कारमध्ये अडकलेल्या कार चालकाला बाहेर काढले. मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर मडगाव येथील जिल्हा इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी हमरस्त्याला तीव्र वळण आहे. या वळणावर कारचालकाचा कारवरील ताबा जाऊन कारने कदंब बसला जोरदार धक्का दिला.

या अपघातात कदंबा इलेक्ट्रिक बसचा चालक रोबिना फकीर याला किरकोळ मार बसला होता, काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्याला घरी जाऊ देण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी व काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई पोलिस कुमक घेऊन घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत कार्य सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: सत्तरीतील वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाचा भक्ती दंग

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

SCROLL FOR NEXT