Farmagudi  Dainik Gomantak
गोवा

Farmagudi: कचरा फेकणाऱ्यांकडून साडेबावीस हजारांचा दंड वसूल; व्यवस्थापन मंडळाची कारवाई, 9 जणांविरोधात गुन्हा नोंद

Garbage fine imposed in Farmagudi: उघड्यावर कचरा फेकण्याची सवय असलेल्यांना कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दणका दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उघड्यावर कचरा फेकण्याची सवय असलेल्यांना कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दणका दिला. फर्मागुढी येथे उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांकडून साडेबावीस हजार रुपयांचा दंड वसूल केला. शुक्रवारी सकाळी चार तास ही मोहीम राबवण्यात आली.

सकाळी ६ ते १० यावेळेत झालेल्या या मोहिमेत साईल कामत (सहाय्यक व्यवस्थापक, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ), सिद्धांत देसाई (कनिष्ठ पर्यावरण अभियंता, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ), कृपेश देसाई (अभियंता, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ), पोलिस शिपाई अर्जुन सावंत व अक्षय अंकोलेकर तसेच बांदोडा पंचायतीचे देवू नाईक सहभागी झाले होते.

या मोहिमेचा उद्देश सतत कचरा टाकणाऱ्या सवयींच्या गुन्हेगारांवर कारवाई करणे व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंड आकारणे हा होता. नागरिकांनी कचरा थेट रस्त्यावर न टाकता पंचायती किंवा महापालिकेमार्फत योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी आणि अवैधरीत्या कचरा टाकण्याचे प्रकार थांबवावेत, असा संदेश देण्यात आला.

९ जणांविरोधात गुन्हा नोंद

फर्मागुढी येथील हार्मनी सर्कल येथे या मोहिमेदरम्यान, ९ जणांविरोधात गोवा नगरपालिका आणि ग्रामपंचायत कायदा, १९९६ च्या कलम ३ ए ५(ब) अंतर्गत कचरा टाकण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांच्याकडून एकूण २२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elon Musk: ‘ॲपल’वरती मस्क चिडले! ‘ॲप’ची शिफारस न केल्याप्रकरणी दाखल करणार दावा; Xवर व्यक्त केली नाराजी

Goa Live News: डिचोलीमधील माणसाची ४.६८ लाख रुपयांची फसवणूक

Gambling Fines: 75 लाखांचा दंड होणार! जुगाराबाबत कडक नियम; अटींचे उल्लंघन केल्यास बसणार मोठा फटका

Socorro: ‘नीज गोंयकारा’चे घर पाडले, सरकारने नुकसान भरपाई द्यावी; कुळ मुंडकार संघर्ष समितीची मागणी

Goa Pregnancy Termination: 5 वर्षांत राज्यात 9627 जणींचे गर्भपात, रोज सरासरी पाच केसेस; केंद्रीय मंत्री पटेल यांची माहिती

SCROLL FOR NEXT