Farewell to Ganpati Bappa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात विघ्नहर्त्याला निरोप

विसर्जनाचा मंत्र उच्चारात गोव्यातील भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: ॐ गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ, स्वस्थाने परमेश्वर, यत्र ब्रह्मादयो देवाः, तत्र गच्छ हुताशन ।। ॐ श्री गणेशाय नमः, ॐ श्री गणेशाय नमः, ॐ श्री गणेशाय नमः। असा विसर्जनाचा मंत्र उच्चारात राज्यातील (Goa) भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशी हे दहा दिवस गणरायांच्या भक्तासाठीचे अत्यंत पवित्र दिवस मानले जातात. चतुर्थीला वाजत गाजत गणराया,आपल्या भक्तांकडे येतात आणि मग ते भक्तांच्या भक्ती आणि वेळेनुसार अनंत चतुर्दशीपर्यंत निरोप घेतात, ही परंपरा आहे. अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'' च्या जयघोषात या दिवशी मिरवणुकीने विधिवत पूजेने निरोप देण्यात आला.

राज्यात अनेक ठिकाणी गल्लीच्या, वाड्यावरच्या एकत्र गणपतीची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी ही करण्यात आली. पणजीच्या फेरीबोटीच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने विशेष लायटिंग मंडप उभारण्यात आला होता. याठिकाणी आरती आणि पूजा करून बाप्पाला निरोप देण्यात आला. तर मिरामार समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे भक्तिभावाने विसर्जन केले.

दुपारी शांतता; रात्री विसर्जनाची लगबग

पणजीतील अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणपतींना पाच दिवसांच्या पूजनानंतर निरोप देण्यात आला. गणपती बरोबर गौरी पूजनाला मोठे महत्त्व असून अनेक ठिकाणी एकत्र पूजा करूनच एकत्र गौरी गणपती विसर्जन केले जाते. त्यामुळे पाच दिवसांच्या विसर्जन साठी गर्दी होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी मात्र गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या कमीच होती. रात्री सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.   पणजी- बेती जलमार्गावरच्या फेरी बोटीच्या साहाय्याने मांडवी नदीच्या मध्यभागी नेऊन अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर मिरामार समुद्र किनाऱ्यावरही गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

Goa Politics: 'मतदारांचा भाजप-मगो युतीलाच पाठिंबा'! आमदार आरोलकरांचा विश्वास; धारगळमधून हरमलकर यांच्या विजयाची खात्री व्यक्त

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

SCROLL FOR NEXT