Goa: गणेशोत्सव संपताच चिकन, अंड्यांचे दर भडकले

राज्यातील बहुतांश शहरांमध्‍ये अंड्यांचे (Eggs) दर 5 रूपयांनी वाढले आहेत. परंतु, ग्रामीण भागात वाजवीपेक्षा अधिक दर वाढविण्यात आले असल्याच्या तक्रारी आहेत.
गणेशोत्सव (Ganeshotsav) संपताच लोकांचा ओढा आता मांसाहारी पदार्थांकडे वळला आहे.
गणेशोत्सव (Ganeshotsav) संपताच लोकांचा ओढा आता मांसाहारी पदार्थांकडे वळला आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पेट्रोल, (Petrol) डिझेल (diesel) आणि गॅस (Gas) सिलिंडरची दरवाढ झाल्याने अगोदरच सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे ती चिकन (Chicken) आणि अंड्यांच्या (Eggs) दरवाढीची. गणेशोत्सव (Ganeshotsav) संपताच लोकांचा ओढा आता मांसाहारी पदार्थांकडे वळला आहे. त्यामुळेच सध्या मासळीचेही दर वाढलेलेच आहेत. शिवाय मासळीला (Fish) पर्याय असलेले चिकन आणि अंडीसुध्दा आता महागली आहेत.

गणेशोत्सव (Ganeshotsav) संपताच लोकांचा ओढा आता मांसाहारी पदार्थांकडे वळला आहे.
Goa Special Biryani: जाणून घ्या चिकन बिर्याणीची रेसिपी

राज्याला परराज्यांतून कोंबडी आणि अंड्यांचा पुरवठा नेहमीप्रमाणेच होत असताना स्थानिक व्यापाऱ्यांनी दर वाढविले आहेत. बाहेरच्या केवळ काहीच कंपन्यांनी कोंबडी आणि अंड्यांचे दर किरकोळ प्रमाणात वाढविले आहेत. परंतु, राज्यात चिकनच्या दरात तब्बल 30 ते 50 रुपयांनी तर अंड्यांच्या दरात प्रतिशेकडा 20 ते 30 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्‍यामुळे अंड्यांचा दर प्रतिशेकडा 500 रुपयांवर पोचला आहे. तर, चिकनचा दर 150 ते 179 रूपये प्रतिकिलो झाला आहे.

दरम्‍यान, राज्यातील बहुतांश शहरांमध्‍ये अंड्यांचे दर 5 रूपयांनी वाढले आहेत. परंतु, ग्रामीण भागात वाजवीपेक्षा अधिक दर वाढविण्यात आले असल्याच्या तक्रारी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com