Konkani Poet Death Dainik Gomantak
गोवा

Konkani Poet Death: प्रसिद्ध काेंकणी कवी के. अनंत भट आणि साहित्यिक वि. ज. बोरकर यांचे निधन

Konkani Poet Death: काेंकणी कवी के. अनंत भट यांचे कोचीत तर कवी, साहित्यिक वि ज बोरकर यांचे मुंबईत निधन.

गोमंतक ऑनलाईन टीम

कोची-केरळमधील प्रसिद्ध काेंकणी कवी के. अनंत भट (८५) यांचे आज शुक्रवार १२ जुलै रोजी सकाळी निधन झाले. प्रकृती अस्‍वस्‍थामुळे काही दिवसांपूर्वी त्‍यांना कोची येथील इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले होते.

तेथे उपचार सुरु असताना आज सकाळी त्‍यांचे निधन झाले अशी माहिती त्‍यांचे निकटवर्तीय सहकारी रमेश पै यांनी दिली. उद्या शनिवार १३ जुलै रोजी त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत. त्‍यांच्‍यामागे पत्‍नी, पुत्र आणि विवाहीत कन्‍या असा परिवार आहे.

अनंंत भट हे एक प्रतिभाशाली कवी होते. कित्‍येक स्‍वतंत्र काव्‍यनिर्मिती बरोबरच त्‍यांनी कित्‍येक पुस्‍तकांचे अनुवाद केले. ‘श्री रामचरित मानस’ या मूळ हिंदी पुस्‍तकाच्‍या कोंकणी अनुवादाला त्‍यांना २००६ साली केंद्रीय साहित्‍य अकादमीचा अनुवाद पुरस्‍कार प्राप्‍त झाला होता.

त्‍यांची तुळशीदास, सूरभजनमाला, संगीतरुपकां, कोंकणी गीतमाला अशी कित्‍येक पुस्‍तके प्रसिद्ध झाली आहेत. १९८० साली केरळमधून प्रकाशित झालेले तपस्‍विनी या कोकणी चित्रपटाचे ते संवाद लेखक होते. त्‍यांचे अनंतू हे पद्यरुपी अात्‍मकथन २०१२ मध्‍ये प्रसिद्ध झाले होते.

मुंबई स्थित गोव्याचे कवी, साहित्यिक वि ज बोरकर आज सकाळी निवर्तले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे सुपुत्र, पत्नी व नातवंडे असा परीवार आहे.

प्रास हा त्यांचा ललीत निबंध संग्रह मौज प्रकाशनाने प्रकाशित केला होता. दर वर्षी मौज, हंस दिवाळी अंकात बोरकर यंदा काय लिहितील यांच्याविषयी वाचकांना कायम उत्कंठा असायची. त्यांनी कविता, ललीत निबंध लिहिले.

प्रास हा त्यांचा ललीत निबंध संग्रह मौज प्रकाशनाने प्रसिध्द केला आहे. वंश ही कादंबरी. माती, आदेवश, नागडा या त्यांच्या नवलिका. वि ज बोरकर यांनी तरल संवेदनेच्या कविताही लिहिल्या. कोंकणी साहित्यिक, कोशकार पर्वरीचे सुरेश बोरकर यांचे ते बंधू होय.

संवेदनशील प्रतिभेचे पण प्रसिध्दीपराड्मुख म्हणून बोरकर परिचित होते. व्यासंगी व चित्रकलेची सूक्ष्ण जाण बोरकरांनी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

SCROLL FOR NEXT