KARANZOL CHOR UTSAV Dainik Gomantak
गोवा

Chorotsav : करंझोळचा रोमांचक चोरोत्सव साजरा; थरारक अनुभूती, पहा व्हिडिओ

भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत पारंपरिक घोडेमोडणीही उत्साहात

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Shigmotsav 2023 : अमाप उत्साह व प्रत्येकाच्या अंगी ओतप्रोत भरलेली पारंपरिक कला यांच्या साक्षीने शेकडोंच्या उपस्थितीत सत्तरी तालुक्यातील करंझोळ येथील श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानचा पारंपरिक चोरोत्सव रविवारी रात्री उशिरापर्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात आलेल्या नागरिकांनी हा पारंपरिक चोरोत्सव पाहण्यासाठी गरेदी केली होती. त्यानंतर पारंपरिक घोडेमोडणी उत्सव साजरा करण्यात आला.

सत्तरी तालुक्यातील करंझोळ गावात साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक कलेच्या जोशपूर्ण अशा या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावातील मांडावर सार्वजनिक सांगणे करण्यात आले. सत्तरी तालुक्यातील प्रत्येक गावातून आलेल्या गावुणग्यांना मान देत उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.

सार्वजनिक सांगणे झाल्यानंतर जोशपूर्ण अवस्थेत सर्व गडे मंडळी श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानच्या प्रांगणात जातात, जिथे चोरोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी तीर्थ देणे कुंकुमतिलक लावणे व व इतर धार्मिकविधी झाले.

उत्सवात आठ गड्यांचा सहभाग

चोरोत्सव व्रताचे पालन करणारे आठ गडे या उत्सवात सहभागी झाले होते. पैकी चार गडे डोक्यापर्यंत तर चार कमरेपर्यंत जमिनीत पुरण्यात आले होते. तर एक सुवांरी, दुसरा मुड्डयाचा चोर, असे चित्र दाखविण्यात आले होते.

सदर घटना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. ‘बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा नारा देत हा चोरोत्सव पार पडला. वादनाच्या निराळ्या प्रथेमुळे या चोरोत्सवात उत्साह दिसून आला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पारंपरिक घोडेमोडणी पार पडली.

यात करंझोळ सातेरी ब्राह्मणी देवीचे दोन तर कुमठोळ येथील देवीचा एक घोडा यांची घोडेमोडणी गावच्या मांडावर साजरी करण्यात आली.

"चोरोत्सवाची शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही त्याच उत्साहाने टिकून आहे. हा उत्सव म्हणजे साठा सत्तरीचा उत्सव असून प्रत्येक गावुणगे यांना सन्मानित करण्यात येत असते. आतापर्यंत या गावाने पोर्तुगीजांच्या विरोधात मोठा संघर्ष केल्याची अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये नोंद आहे."

-हरिश्चंद्र गावस,ज्येष्ठ ग्रामस्थ करंझोळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT