पालखीसोबत छत्र्या नाचल्या, गुलालाचीही उधळण; धार्मिक सलोख्याचे दर्शन

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणचा छत्रोत्सव; अबालवृद्धांचा सहभाग
Shri Shantadurga Kunkallikarin Temple
Shri Shantadurga Kunkallikarin TempleDainik Gomantak
Published on
Updated on

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणच्या छत्रोत्सवाला यंदा भक्तांचा महापूर पहायला मिळाला. हजारो संख्येने भक्त देवीच्या पालखी मिरवणुकीसाठी दुपारी फातर्पा मंदिरात उपस्थित होते.

शेकडो भक्त महिला, बुजुर्ग, लहानमुले व पुरुष भक्तांनी पालखी बरोबर छत्र्या नाचवत व गुलालाची उधळण करीत फातर्पा मंदिरापासून तळयेभाट पर्यंतपायी चालत मिरवणुकीत सहभागी झाले.

काही भक्तांनी व खास करून बारा गावकार देवीच्या पालखी बरोबर फातर्पाहून मूळस्थानी व मूळस्थानाहून पुन्हा फातर्पापर्यंत देवीच्या पालखी मिरवणुकीत भाग घेतला.

Shri Shantadurga Kunkallikarin Temple
Lavani : चंद्रा’च्या दिलखेचक अदांनी रसिक घायाळ

हिंदू-ख्रिस्ती भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीणीच्या वार्षिक छत्रोत्सवात हजारो भाविकांनी गुलालाची उधळण करीत, धोल ताशाच्या गजरात बारा छत्र्या नाचवत छत्रोत्सवाचा आनंद घेतला.

दुपारी बारा वाजता धार्मिक विधी संपन्न झाल्यावर देवीला भक्तांनी गुलाल अर्पण केला. बारा छत्र्या नाचवत ढोल ताशाच्या गजरात देवीचा जयजयकार करीत देवीची पालखी मिरवणूक पारंपारिक गोविंद घाटी मार्गाने मल्लागिणी, जुझेंगाळ, सिद्धनगर, नायगिलो, भिवसा, व्होडी या मार्गाने मूळस्थानी तलयेभाट येथे आगमन झाले. भक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी देवीचे स्वागत करून देवीला नारळ ओटीची भेट अर्पण करून देवीचे आशीर्वाद घेतले.

ढोल ताशाच्या गजरात हरहर महादेवाचा जयजयकार करीत व देवीचा जयजयकार करीत देवीच्या भक्तांनी देवीला गुलाल अर्पण करून देवीचे दर्शन घेतले. महिलांनी देवीला ओटी अर्पण करून देवीचे दर्शन घेतले. चार वाजता देवीचे मूळस्थानी आगमन झाल्यावर भक्तांनी देवीचा जयजयकार करीत ढोल ताशाच्या तालावर नाचत देवीचे स्वागत केले.

Shri Shantadurga Kunkallikarin Temple
IndiGo Flight Emergency Landing: प्रवाशासोबत अचानक असं काही घडलं की पाकिस्तानला केलं इमर्जन्सी लँडींग, पण त्याआधीच...

हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी मूळ स्थानी आले होते. सहा वाजता भक्तांना दर्शन देऊन देवीचे मूळ स्थानावरून पुन्हा परतीच्या मार्गी प्रस्थान झाले. बारा छत्र्या नाचवत व गुलालाची उधळण करीत देवीची पालखी मिरवणूक मारकूट, भेकल्यावाडो, माड्डीकटा,देमानी, कटा, बोमडामोळ या ठिकाणी भक्तांना दर्शन देऊन मंदिरात पोहचल्यावर धुळी वंदनाने छत्रोत्सवाची सांगता झाली.

ज्या ख्रिस्ती नागरिकांनी आपल्या भागात खास मंडप घालून देवीचे स्वागत केले. झुजेगाळ, भिवसा, व्होडी, सालेमांड भागातील ख्रिस्ती भाविकांनी आपल्या घरासमोर तोरण उभारून सजावट करून देवीचे स्वागत केले.

अनोखे आंगवण

काही भक्त देवीकडे आपली मनोकामना व्यक्त करतात. देवी मागणीची व सासाईची देवी म्हणून प्रसिद्ध आहे, देवी भक्तांची मनोकामना पूर्ण करते, असा भक्तांचा विश्वास आहे.

काही भक्त पालखीच्या खालून जाण्याची आंगवण करतात आणि काम झाल्यावर छत्रोत्सवाच्या दिवशी देवीच्या पालखीच्या खालून जातात व आंगवण फेडतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com