Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पोलिस बोलावताहेत म्हणून गेली, तोतयांनी पळवले 6 लाखांचे मंगळसूत्र; भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे डिचोलीत गोंधळ

Bicholim Fake Police Theft: दरम्यान, नऊ महिन्यांपूर्वी शहरातील एका वृद्ध दुकानदाराला अशाच प्रकारे लुबाडताना तिच्या गळ्यातील सुमारे ७ लाख रुपयांची सोनसाखळी पळविली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: पोलिस असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी डिचोलीतील एका महिलेचे मंगळसूत्र पळविले. ही घटना शनिवारी भर दुपारी बाजार परिसरातील बंदरवाडा येथे घडली. तोतया पोलिसांसमवेत एक महिलाही होती, असा संशय आहे. माधवी मोहन नाईक या महिलेचे हे मंगळसूत्र असून त्याची किमत अंदाज सहा लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

दिवसाढवळ्या गजबजलेल्या भागात लुबाडण्याचा हा प्रकार घडल्याने डिचोलीत खळबळ माजली आहे. दरम्यान, नऊ महिन्यांपूर्वी शहरातील एका वृद्ध दुकानदाराला अशाच प्रकारे लुबाडताना तिच्या गळ्यातील सुमारे ७ लाख रुपयांची सोनसाखळी पळविली होती. त्यामुळे डिचोली शहरात ''तोतया'' पोलिसांचा वावर असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.

माधवी नाईक दुपारी साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास बंदरवाडा येथून रस्त्याने गावकरवाड्याच्या दिशेने जात होत्या. आगा कॉम्प्लेक्स समोर एक महिला माधवी हिच्याजवळ आली. पोलिस बोलावताहेत असे सांगून त्या अज्ञात महिलेने तेथील गल्लीत नेले. त्याठिकाणी उभे असलेल्या ''त्या'' दोघाही भामट्यांनी पोलिस असल्याचे माधवी हिला सांगितले.

मंगळसूत्र खेचणारे डिचोलीत फिरत आहेत. असे सांगून भामट्यांनी माधवी हिला गळ्यातील मंगळसूत्र काढण्यास भाग पाडले. नंतर ते मंगळसूत्र कागदात गुंडाळल्याचे दाखवून कागदाची पुडी माधवी हिच्याकडे दिली. घरी गेल्यानंतर माधवी हिने कागदाची पुडी उघडली असता, पुडीत दगड असल्याचे तीला आढळून आले. दगड पाहताच आपणाला गंडविल्याचे तिच्या लक्षात येताच माधवी हिच्यावर कपाळावर हात मारण्याची पाळी आली.

तीन महिन्यांपूर्वी अशीच घटना...

तीन महिन्यापूर्वी म्हणजेच गेल्या सप्टेंबर महिन्यात मये येथे एका वृद्ध फूल विक्रेत्या महिलेला लुबाडण्याची घटना घडली होती. चोरट्याने देवीचे दर्शन घेण्याच्या बहाण्याने मंदिरात फूलविक्रेत्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ पळविली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

50 वर्षीय आरोपीचा 'मानसिक' बनाव फसला! POCSO न्यायालयाने जामीन फेटाळला; 'IPHB'ची कागदपत्रंही निरुपयोगी

Brahmin History: अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति। ब्राह्मणी उपासना आणि सभ्यता

Goa Live News: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट' शॅकला भीषण आग

Theatre Tradition Goa: समृद्ध परंपरा लाभूनही, गोमंतकीय रंगभूमीला वर्तमानकाळात अनेक आव्हानांना सामोरे का जावे लागत आहे?

Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

SCROLL FOR NEXT