Baddem Goa businessman kidnapping Dainik Gomantak
गोवा

VIDEO: “आम्ही ED अधिकारी आहोत, गुपचूप आमच्यासोबत या”! भामट्यांनी केले व्यावसायिकाचे अपहरण; कारवारमध्ये नेऊन लुटले

Goa Kidnapping Case: ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून बड्डे येथील एका व्यावसायिकाचे अपहरण करून भामट्यांनी कारवार येथे नेऊन लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून बड्डे येथील एका व्यावसायिकाचे अपहरण करून भामट्यांनी कारवार येथे नेऊन लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. फातोर्ड्यातील बड्डे येथील अशोक कुमार (५६) यांच्यावर हा प्रसंग ओढवला.

२४ मार्च रोजी माकझान येथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. संशयितांनी त्यांच्याकडील सुमारे तीन लाख रुपये हिसकावून घेतले व त्यानंतर त्यांना सोडून दिले. अपहरणकर्त्यांनी सोडून दिल्यानंतर अशोक कुमार यांनी गोवा गाठून मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तक्रारदाराने काही संशयितांची नावेही पोलिसांना दिली आहेत. निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी तपास करीत आहेत.

असे झाले अपहरण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी दुपारी सुमारे दीड वाजता माकझान येथील कॅनरा बँकेजवळ संशयितांनी त्यांचे अपहरण केले. “आम्ही ईडी अधिकारी आहोत, गुपचूप आमच्यासोबत या,” अशी दमदाटी करून त्यांना त्यांच्या हुंडाय कारमध्ये बसवण्यात आले व थेट कारवार येथे नेले.

तेथे एका निर्जनस्थळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत कारमधील सुमारे तीन लाख रुपये हिसकावून घेतले व त्यांना तिथेच सोडून पसार झाले. तक्रारदाराने नीलेश जाधव, बलराम शेट्टी, अजित व अन्य अज्ञात व्यक्तींनी आपल्याला लुटल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT