VIDEO: लाथाबुक्क्या, तुंबळ हाणामारी! म्हापशात पार्किंगवरून पर्यटक-स्थानिकांत राडा; परिसरात काही काळ तणाव

Mapusa Fight: म्हापसा टॅक्सी स्टँड परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून कर्नाटकचे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
Mapusa parking dispute
Mapusa parking disputeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा टॅक्सी स्टँड परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून कर्नाटकचे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून आलेले काही पर्यटक म्हापसा टॅक्सी स्टँडवर शीतपेय घेण्यासाठी थांबले होते. तिथे स्थानिक गाडी पार्क केली होती. ही गाडी मागे घेण्याच्या कारणावरून पर्यटकांचा तिथल्या स्थानिकांशी वाद झाला.

Mapusa parking dispute
Goa Politics: खरी कुजबुज; ...अन् झोपलेले भाजप कार्यकर्ते जागे झाले!

सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची पाहता पाहता विकोपाला गेली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवल्याने परिसरात काही काळ तणाव पसरला होता. अखेर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणून सार्वजनिक शांततेचा भंगप्रकरणी दोन्ही बाजूंच्या संबंधितांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Mapusa parking dispute
Goa News: वीज खांबांवर केबल्सचे 'बेकायदेशीर' जाळे; दोन कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल, वाचा दिवसभरातील घडामोडी

फातोर्डा-मडगाव येथून मोटारसायकलची चोरी

येथील कदंब बसस्थानकाच्या परिसरात खुल्या जागेत उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. या प्रकरणी विशाल रामू चाळके यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी २३ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मडगाव येथील चाणक्य बिल्डिंगसमोर असलेल्या खुल्या पार्किंग जागेतून तक्रारदाराची मोटारसायकल चोरीला गेली. या दुचाकीची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे. अज्ञातांनी पार्किंगमधून ही दुचाकी लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com