Fake ED Officer Arrested Dainik Gomantak
गोवा

Fake ED Officer: बंदूकीचा धाक दाखवून व्यावसायिकाला कारवारला नेलं अन् लुटलं, तोतया ईडी अधिकाऱ्याला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कर्नाटकात धडाकेबाज कारवाई

Fake ED Officer Arrested: ‘ईडी’चा अधिकारी असल्याचे भासवून बड्डे येथील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला लुबाडणाऱ्या तोतयाला मायणा-कुडतरी पोलिसांनी कर्नाटकातील दावणगिरी येथे अटक केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: ‘ईडी’चा अधिकारी असल्याचे भासवून बड्डे येथील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला लुबाडणाऱ्या तोतयाला मायणा-कुडतरी पोलिसांनी कर्नाटकातील दावणगिरी येथे अटक केली. निलेश भीमराव जाधव (वय ५३) असे या भामट्याचे नाव असून तो मूळ अकोला (महाराष्ट्र) येथील रहिवासी आहे.

गोव्यात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून अधिक तपासासाठी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. २४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास माकाझन येथील कॅनरा बँकेजवळ अशोक कुमार यांचे अपहरण करण्यात आले होते. संशयितांनी त्यांच्या कारमधूनच त्यांना पळवून कारवार येथे नेले.

तेथे एका निर्जन ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देत कारमधील सुमारे ३ लाख रुपये लुटून आरोपी फरार झाले होते. यानंतर अशोक कुमार यांनी गोव्यात येऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान माकाझन येथील कॅनरा बँकेचे व्यवस्थापक अजित कुमार कट्टीमणी (वय ३४, रा. मडगाव) याला अटक करण्यात आली होती.

पोलिसांना देत होता गुंगारा; अखेर सापळा रचून अटक

मुख्य संशयित निलेश जाधव पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवून त्याचा ठावठिकाणा शोधला असता तो कर्नाटकातील दावणगिरी येथे असल्याचे निष्पन्न झाले. तेथून तो बंगळुरूकडे पसार होण्याच्या तयारीत असतानाच मायणा-कुडतरी पोलिस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक संतोष देसाई, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर आणि पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, हवालदार गोरखनाथ गावस तसेच पोलिस शिपाई समीर सुधी व चेतन कोळी यांनी ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT