Colva Police Arrest Serial Cheater Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: इन्स्टाग्रामवरील 'तो' बनावट डॉक्टर जेरबंद, लग्नाचं आमिष दाखवून तरुणींची केली फसवणूक; राजेंद्र सैनीला बेड्या

Colva Police Arrest Serial Cheater: डॉक्टर असल्याचे भासवून राजेंद्र सैनी हा युवतींना आपल्या प्रेमजाळ्यात अडकवत होता. त्याच्या या मोहपाशात अनेक युवती अडकल्या असून, इन्स्टाग्रामवरून मैत्री करून नंतर तो विवाहाचे आमिष दाखवत त्यांना आपल्या वासनेची शिकार बनवत होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: डॉक्टर असल्याचे भासवून राजेंद्र सैनी हा युवतींना आपल्या प्रेमजाळ्यात अडकवत होता. त्याच्या या मोहपाशात अनेक युवती अडकल्या असून, इन्स्टाग्रामवरून मैत्री करून नंतर तो विवाहाचे आमिष दाखवत त्यांना आपल्या वासनेची शिकार बनवत होता. तसेच त्यांची आर्थिक फसवणूकही करत होता, अशी धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

सोशल मीडियावरून तो आपले सावज हेरत होता. त्यानंतर त्यांच्याशी मैत्री करून गोड बोलत त्यांना मोहात पाडत होता. सध्या हा संशयित कोलवा पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या मोबाईलमध्ये अनेक युवतींचे आक्षेपार्ह फोटो आढळले आहेत. पोलिसांनी हा मोबाईल जप्त करून तो पुढील तपासासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविला आहे.

संशयित त्या युवतीला भेटण्यासाठी गोव्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. तो गोव्यात आल्यानंतर कोलवा येथे पोलिसांनी त्याला अटक केली.संशयिताविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ३१६ व ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल करून सहा दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रथमेश महाले पुढील तपास करत आहेत.

पीडितेकडून उकळले चार लाख रुपये

राजेंद्र हा अवघा २८ वर्षांचा असून तो मूळ उत्तर प्रदेशातील मथुरा येथील आहे. कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका युवतीशी त्याने इन्स्टाग्रामवरून मैत्री केली होती. त्यानंतर तिला विवाहाचे आमिष दाखवून आपण आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगत पीडितेकडून चार लाख रुपये उकळले होते. तसेच तिच्या आईची सोन्याची साखळी व अंगठीही घेतली होती. मागील वर्षी २८ ऑगस्टपासून चालू वर्षी ८ मेपर्यंत हा प्रकार सुरू होता. तसेच त्या युवतीचे त्याने लैंगिक शोषणही केले होते. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्या युवतीने कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT