arrested Dainik Gomantak
गोवा

Fake Currency Racket Bust: बेळगावात बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश! गोव्यातील तिघांसह बिहारच्या तरुणाला अटक; 500 च्या नोटांचे पाकीट जप्त

Belagavi Market Police Action: कर्नाटक-गोवा सीमाभागात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा बेळगावच्या मार्केट पोलिसांनी सोमवारी (16 मार्च) अत्यंत चातुर्याने पर्दाफाश केला.

Manish Jadhav

Goa Fake Notes Case : कर्नाटक-गोवा सीमाभागात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा बेळगावच्या मार्केट पोलिसांनी सोमवारी (16 मार्च) अत्यंत चातुर्याने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी गोव्यातील तीन आणि बिहारमधील एका संशयित आरोपीला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 500 रुपयांच्या तब्बल 495 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या टोळीच्या अटकेमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून, न्यायालयाने (Court) सर्व संशयितांना 27 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुना पीबी रोडवरील भाजी मार्केटजवळ असलेल्या कार पार्किंगमध्ये काही संशयास्पद हालचाली होत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिथे उभ्या असलेल्या एका कारवर छापा टाकला. यावेळी कारमध्ये बसलेले तरुण पोलिसांना पाहून गडबडले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे 500 रुपयांच्या नोटांचे पुडके सापडले.

बारकाईने तपासणी केली असता, या सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ मोहम्मद अरबाज मोहम्मद अदम (21, रा. दक्षिण गोवा), रुपेश हनुमंत नाकोडे (26, रा. काणकोण, दक्षिण गोवा), मोहम्मद हुसेन बक्षी (23, रा. मडगाव, दक्षिण गोवा) आणि श्रवणकुमार टुनटुनमल्ली (25, रा. बेगूसराय, बिहार) या चौघांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी (Police) केवळ 2 लाख 47 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटाच नव्हे, तर गुन्ह्यात वापरलेली सुमारे 3 लाख रुपये किमतीची कार आणि चार महागडे मोबाईल फोनही जप्त केले आहेत. ही टोळी गोव्याहून बेळगावात या नोटा खपवण्यासाठी आली होती की यामागे आणखी काही सूत्रधार आहेत, याचा तपास आता मार्केट पोलीस करत आहेत. विशेषतः भाजी मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी या नोटा चालवण्याचा त्यांचा विचार असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आर्थिक व्यवहार करताना नोटा तपासून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT