RDX call Mumbai Goa
RDX call Mumbai Goa  ANI
गोवा

'RDX आणि दोन पाकिस्तानी असलेला ट्रक गोव्याकडे जातोय', 'त्या' फेक कॉल प्रकरणी एकाला अटक, अजब कारण समोर

Pramod Yadav

आरडीएक्सने भरलेला ट्रक मुंबईहून गोव्याकडे जात असून, त्यात दोन पाकिस्तानीही आहेत. अशी माहिती फोन करून पोलिसांना देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी एका अटक केली आहे.

पोलिसांनी फेक कॉल केल्याप्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आले आहे. ट्रकने त्याच्या मोटरसायकलला धडक दिल्याने त्याने रागाच्या भरात खोटी माहिती पोलिसांना दिली. अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

पांडे असे या व्यक्तीचे नाव आहे. फेक कॉल प्रकरणी पांडे विरोधात वरळी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 509 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याआधीच्या दोन धमक्यांमध्ये पहिल्या धमक्यांमध्ये पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरला परत पाठवण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर योगी आणि मोदी टार्गेट केले जाणार असल्याचे बोलले जात होते.

मुंबई पोलिसांना अशा प्रकारचे बनावट फेक कॉल येण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही महाराष्ट्राच्या मुंबई पोलिसांना धमकीचे फोन आले आहेत. गेल्या दहा दिवसांबद्दल बोलायचे झाले तर मुंबई पोलिसांना मिळालेली ही तिसरी धमकी आहे.

तीन दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण कक्षालाही धमकी मिळाली होती. ज्यामध्ये 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा मुंबईत घडवून आणला जाईल, असे म्हटले होते.

इतकेच नाही तर या मेसेजमध्ये एका अज्ञात व्यक्तीने यूपीमधील योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या टार्गेटवर असल्याची धमकी दिली होती. काही ठिकाणी काडतुसे आणि एके47 ही पोहोचल्याचे सांगण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT