Online Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: 'कौन बनेगा करोडपती'च्या नावाने; गोव्यात सायबर चोरांचा धुडगूस!

Goa Crime News: या प्रकरणात पाच व्यक्तींना किमान 10 लाखांचा गंडा घातला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: फोनवर बनावट कॉल करून किंवा बनावट ईमेल पाठवून नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. दक्षिण गोव्यात अशा तऱ्हेचे आणखी 5 सायबर चोरीचे गुन्हे घडलेत. या नवीन प्रकरणात पाच व्यक्तींना किमान 10 लाखांचा गंडा घातला आहे. मागच्या आठवड्यात अशाच प्रकारच्या सात घटना उघडकीस आल्या होत्या. त्यात सुमारे 12 जणांना साडेसात लाखांचा फटका बसला होता.

कपड्याचे पार्सल पाठवून देतो असे सांगून सिद्धेश पांढरेकर (39) यांची 99 हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर मडगाव येथील एका व्यक्तीला ऑनलाईन गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होणार, असे सांगून अडीच लाखांना लुटण्यात आले.

शिवाय आता ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नावाने फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी मोबाईलसह सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. तर विविध आमिषे दाखवून नागरिकांची लुबाडणूक करण्यात येत आहे. पोलिसांकडून जनजागृती सुरू असतानाही लोक अशा भुलथापांना बळी पडत अाहेत.

कार आणि रोख रकमेच्या बक्षिसाला भाळले अन्...

1.फातोर्डा येथील दिलीपकुमार कुलकर्णी यांना ‘कौन बनेगा करोडपती’ स्पर्धेचे बक्षीस लागले आहे. ती रक्कम मिळविण्यासाठी आधी काही रक्कम भरा, असे सांगून 4 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. कुलकर्णी यांना दोघाजणांनी मोबाईलवर संपर्क साधून कार आणि रोख रकमेचे बक्षीस पाहिजे असल्यास पैसे भरण्यास सांगितले होते. पैसे भरूनही बक्षीस न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

2. दुसऱ्या एका प्रकरणात नुवे येथील मनोजकुमार शर्मा यांच्या क्रेडिट कार्डद्वारे अज्ञाताने 43 हजार 736 रुपये खात्यातून काढून गंडा घातला. 22 सप्टेंबर रोजी आपल्या खात्यातून ही रक्कम काढण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3. नावेली येथील रुडॉल्फ रिबेलो नामक व्यक्तीला तुम्हाला कुरियरमधून गिफ्ट पाठविली आहे. हे पार्सल घेण्यासाठी आगावू पैसे भरा, असा संदेश आला. हे गिफ्ट मिळावे यासाठी त्यांनी 1 लाख 23 हजार रुपये भरले. पण शेवटपर्यंत गिफ्ट न मिळाल्याने रूडॉल्फ यांनी मडगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली.

पोलिसांचे आवाहन: राज्यात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत. विशेषत: सुशिक्षित लोकच गुन्हेगारांच्या आमिषाला भुलून बळी पडताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या आर्थिक भुलथापांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे. कोणाविषयी संशय आल्यास त्वरित तक्रार नोंदवण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

जसपाल सिंग, पोलिस महासंचालक-

ऑनलाईन चोरी प्रकरणात चोर कुठेही राहून कुणालाही लुटू शकतात. पोलिसांनी अशा अनेक चोरांना अटक केली आहे. मात्र, अनेकदा पोलिसांना चोरांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. या चोऱ्यावर नियंत्रण येण्यासाठी आता लोकांनीच सतर्कता बाळगली पाहिजे. कुठल्याही व्यक्तीला आपले बँक डिटेल्स आणि अन्य माहिती देऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT