Tourism Department : वेलसाव, दांडो येथे पर्यटन विभागाचे सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखले

जेटी किंवा कोळसा हबला ग्रामस्थांचा विरोध
Tourism Department
Tourism DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: आज दुपारी पर्यटन विभागाचे अधिकारी सर्वेक्षण करण्यासाठी आले असल्याचा सुगावा वेलसाव, दांडो येथील गावक-यांना लागताच त्यांनी तेथे धाव घेतली व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चालवलेले काम रोखले.

(Velsao Dando Citizen Oppose Tourism Department's survey)

Tourism Department
Save Soil : माती संरक्षणाचा संदेश घेऊन 17 वर्षीय साहिल देशभ्रमंतीवर

कारण हे काम बेकायदेशीर असल्याचे मत गावकऱ्यांचे आहे. यावेळी गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ते निरुत्तर झाले. गावक-यांनी अधिकाऱ्यांकडे सर्वेक्षणाच्या परवानगीबाबत विचारणा केली, पण ते देऊ शकले नाहीत. दरम्यान गोयचो रापोणकारांचो एकवोटचे वोलेंसिओ सिमॉईश यांनी सांगितले की, पर्यटन विभाग कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षण करण्यास आतुरलेला आहे.

Tourism Department
Olencio Simoes : कुठ्ठाळीची सुरक्षा राम भरोसे; कायदा व सुव्यवस्था बिघडली

सिमॉईश म्हणाले, सरकारने जमिन बळकावून त्याजागी प्रकल्प उभे करण्याचा घाट रचला आहे. पर्यटन विभागाने उन्हामुळे नष्ट झालेले आमचे किनारे पुनर्संचयीत करण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे. आमच्या गावामध्ये जेटी किंवा कोळसा हब आणण्याचा पर्यटन विभागाचा चुकीचा हेतू आहे. तो आम्ही गावात कदापी होऊ देणार नाही असे सिमॉईश म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com