Goa AAP Valmiki Naik Dainik Gomantak
गोवा

बनावट ‘ॲंटी व्हेनम’प्रकरणी FIR का नोंदवला नाही? वाल्मिकी नाईक यांचा सवाल; 2 दिवस उलटूनही पोलिसांचे दुर्लक्ष

Valmiki Naik: पणजी पोलिस एफआयआर दाखल करण्यात का अपयशी ठरले आहेत, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी उपस्थित केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Health Scam : आरोग्य संचालनालयाला पुरवलेल्या ‘बनावट अँटी-व्हेनम’चे प्रकरण बाहेर येऊन दोन दिवस उलटले तरीही पणजी पोलिस एफआयआर दाखल करण्यात का अपयशी ठरले आहेत, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

पणजी पोलिस स्थानकाच्याबाहेर रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२५ मध्ये सार्थक च्यारी या १७ वर्षीय मुलाला साप चावला होता. त्याला हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथून त्याला म्हापशातील आझिलो इस्पितळात आणि त्यानंतर त्यास गोमेकॉत नेले, त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला.

हे प्रकरण सर्वांना सहज घडलेल्या घटनेसारखे वाटत आहे. मात्र, सार्थकचा मृत्यू खरोखरच बनावट ‘अँटी-व्हेनम’मुळे झाला का? असा सवाल उपस्थित होतो. कारण ज्यांनी ही औषधे ‘गोमेकॉ’ला पुरवली आहेत, त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

ज्या कंपनीने हे औषध तयार केले आहे, त्या कंपनीने आमच्याकडे हे औषध तयार केले नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्या कंपनीने पोलिसांत तक्रार दिली आहे. या औषधाचे जे सिरीयल आणि बॅच नंबर दिले आहेत, त्यानुसार गोव्यात या औषधाचा पुरवठाच केला नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

ते नंबर बिहारमधील दाखवले जातात, ते नंबर गोव्यात कसे पोहोचले असा सवाल नाईक यांनी केला. एफडीएने १०८० बाटल्या ताब्यात घेतल्या असून, गोवा पोलिसांनी तात्काळ याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT