Sainit Merry highscool
Sainit Merry highscoolDainik Gomantak

Mapusa Anti-Addiction Move: मद्य, तंबाखू, ड्रग्जला नकार! 360 विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; म्हापशातील शाळेत उपक्रम

Drug Awareness: म्हापसा येथील सेंट मेरी हायस्कूल येथे सामाजिक सप्ताह साजरा करण्यात आला असून या निमित्ताने इयत्ता आठवी ते दहावीच्या ३६० विद्यार्थ्यांनी ‘मद्य, तंबाखू आणि ड्रग्जला नकार’ देणारी शपथ घेतली.
Published on

पणजी: म्हापसा येथील सेंट मेरी हायस्कूल येथे नुकताच सामाजिक सप्ताह साजरा करण्यात आला असून या निमित्ताने इयत्ता आठवी ते दहावीच्या ३६० विद्यार्थ्यांनी ‘मद्य, तंबाखू आणि ड्रग्जला नकार’ देणारी शपथ घेतली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना किशोरावस्था, समवयस्क दबाव, व्यसनाधीनता आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांवर माहिती देणारे विविध सत्र घेण्यात आले असून यात सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले.

या विशेष सत्राचे प्रमुख वक्ते प्राध्यापक व प्रमुख, सामुदायिक वैद्यकीय विभाग, गोमेको बांबोळीतील डॉ. जगदीश काकोडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण केली. त्यांनी विद्यार्थ्यांना वास्तवातील केस स्टडीज सांगितल्या. त्यांच्या या अनोखी सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना देखील विषयाशी आत्मीयता वाटली आणि विद्यार्थी मन लावून त्यांचे बोल ऐकू लागले.

Sainit Merry highscool
Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

या शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहाला ए.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर जॉय ए.सी., शिक्षिका सायनोरा पिंटो, अश्विनी मोरजकर आणि शिक्षक रॉईस्टन डिसोझा यांचा सक्रिय सहभाग होता.

Sainit Merry highscool
School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

डॉ. काकोडकरांचे प्रभावी मार्गदर्शन

डॉ. जगदीश काकोडकर यांनी चांगल्या मूल्यव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या सत्राने उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांवर देखील सर्वार्थाने सकारात्मक प्रभाव पडला. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांबरोबर काही शिक्षक आणि पालकांनीही ''मद्य, तंबाखू आणि अमली पदार्थांना कायमस्वरूपी नकार'' देणारी शपथ घेऊन केला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरला असून, समाजात सकारात्मक संदेश यातून पसरण्यात मदत होईल व ही पिढी वाईट व्यासनापासून दूर राहील, असा विश्‍वास व्यक्त झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com