RTPCR Center

 
Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारकडून तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर केंद्राची सोय

खासगी रुग्णालयाला काम, आंतरराज्य प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची सीमेवर कडक तपासणी

दैनिक गोमन्तक

काणकोण : गोव्याच्या पोळे तपासणी नाक्यावर कर्नाटकातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची कोरोना लसीकरण कागदपत्रांची तपासणी करूनच राज्यात प्रवेश देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकातील माजाळी तपासणी नाक्यावर गोव्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. फरक एवढाच की, गोवा सरकारने (Goa Government) पोळे येथे तपासणी नाक्यावरच आरटीपीसीआर तपासणी केंद्राची सोय केली आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण गोव्यात (goa) व कर्नाटकांत सापडल्याने दोन्ही राज्यांनी आंतरराज्य प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

त्यात कर्नाटकात या पार्श्वभूमीवर रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे याचे गांभीर्य वाढले आहे. मडगाव-कारवार व परत कदंबा महामंडळाच्या व कर्नाटक (Karnataka) परिवहन महामंडळाच्या (Corporation) प्रवासी बस गाड्यातून प्रवास करणाऱ्या व खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कारवारच्या बाजूने माजाळी तपासणी नाक्यावर व गोव्यात प्रवेश करताना पोळे तपासणी नाक्यावर कोरोना (Corona) लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी घेतलेले कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे लागते अन्यथा आरटिपीसीआर चाचणी करून घ्यावी तेव्हाच त्यांना प्रवेश देण्यात येत आहे.

खासगी रुग्णालयाला काम...

पोळे तपासणी नाक्यावर हे काम सरकारने दोन खासगी रुग्णालयांना दिले आहे. त्या रुग्णालयाचे (Hospital) कर्मचारी दिवसांतील चोवीस तास शुल्क आकारून सेवा देत आहेत. दोन्ही राज्यातून परदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात नववर्ष काळात ये-जा सुरू आहे. त्यामुळे ही तपासणी कडक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT