Goa film shooting  Dainik Gomantak
गोवा

Goa Shooting: गोव्यातील शूटिंग व्यवसायाला खंडणीचे ग्रहण! 2 परदेशी प्रोजेक्ट रद्द; 'लाईन प्रोड्युसर' अध्यक्षांनी दिली धक्कादायक माहिती

Shooting In Goa: टोनी कोस्टा यांनीसुद्धा गेल्या वर्षी आपले दोन परदेशी प्रकल्प गमावलेले आहेत.‌ ते म्हणतात, ‘परदेशी चित्रपट निर्मात्यांना ‘टेबलाखालून देण्याची’ भाषा आवडत नाही.

Sameer Panditrao

पणजी: टोनी कॉस्ता हे ‘गोवन लाईन प्रोड्युसर असोसिएशन’चे अध्यक्ष आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोव्यात पंचायत सदस्यांची ज्याप्रमाणे दादागिरी चालते व ज्याप्रमाणे ते शूटिंगच्या ठिकाणी आपली खंडणी वसूल करण्यासाठी येतात ती खूप भयानक बाब असते. अगदी गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षांच्या मतदारसंघातही अशी प्रकरणे घडतात.‌

स्थानिक राजकारणी किंवा पक्ष कार्यकर्ते सरळ शूटिंगच्या जागी येऊन पैशांची मागणी करतात. जर त्यांना गोवा मनोरंजन संस्थेकडून मिळालेले परवानगीचे पत्र दाखवले तर ‘कुठली गोवा मनोरंजन सोसायटी? आपण तिला ओळखत नाही’ असे ते स्पष्टपणे सांगतात.

टोनी कोस्टा यांनीसुद्धा गेल्या वर्षी आपले दोन परदेशी प्रकल्प गमावलेले आहेत.‌ ते म्हणतात, ‘परदेशी चित्रपट निर्मात्यांना ‘टेबलाखालून देण्याची’ भाषा आवडत नाही. हे माझे दोन्हीही चित्रपट निर्माते क्लाईंट गोव्याबद्दल अतिशय कडवट भावना घेऊन गोव्यातून निघून गेले आहेत. हे दुर्दैवी आहे’.

शिवाय किनाऱ्यावरील शॅक मालक, टॅक्सी चालक यांचीही दादागिरी वेगळ्या पद्धतीने चालू असते. पोलिस संरक्षण देण्यासाठी तयार नसतात. गोवा मनोरंजन सोसायटीने वेगवेगळ्या लोकप्रिय जागांवर पार्किंगसाठी जागाही ठरवलेल्या नाहीत. आतापर्यंत गोव्यातील ज्या शेकडो निरनिराळ्या लोकेशनवर शूटिंग झालेले आहे त्या जागांचा अभ्यास गोवा मनोरंजन सोसायटीने केला आहे काय? तिथे नेमक्या काय अडचणी आहेत व चित्रपट निर्मात्यांसाठी आपण त्या जागा अधिक स्नेहपूर्ण कशा करू शकतो याचा विचार केला आहे काय? या प्रश्‍‍नांचे उत्तर अर्थातच नकारार्थी आहे.

शूटिंगसाठी ''सिंगल विंडो सिस्टम'' असली तरी प्रत्यक्षात लाईन प्रोड्युसरना विविध खात्यात खेपा टाकाव्या लागतात. गोवा मनोरंजन सोसायटी आणि ही खाती यांच्यात सध्या कुठलाही ताळमेळ नाही. शूटिंगच्या नियमांबद्दलही त्यामुळे स्पष्टता नाही आणि त्याचा परिणाम म्हणून निर्मात्यांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. हल्लीच दिवाडी बेटावरील दोन्ही पंचायतीनी गावात शूटिंग करण्यास परवानगी देणार नाही असा ठराव घेतला. अशाच प्रकारचे ठराव इतर पंचायतीने घेतल्यास मग शूटिंगसाठी गोव्यात मैत्रीपूर्ण वातावरण कुठले असेल? गोवा मनोरंजन सोसायटीचे पदाधिकारी आपल्या वातानुकूलित खोलीत बसून शूटिंगची प्रकरणे हाताळतात त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष जागेवर काय घडत असते याची एकतर माहिती नसते शिवाय तिथे काय घडत असेल याबद्दल त्यांना पर्वाही नसते असेच गोव्यातील लाईन प्रोड्युसरचे म्हणणे आहे.

जीवाची चैन करणे हाच हेतू?

या असल्या विपरीत परिस्थितीत गोवा मनोरंजन संस्थेचे पदाधिकारी परदेशी चित्रपट निर्मात्यांना गोव्यात शूटिंग करण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी चक्क कान्सला चालले आहेत.

गोव्यात शूटिंगसाठी व्यवस्थित साधन सुविधा नाही याची तसेच शूटिंगसाठी येणाऱ्या वरील साऱ्या अडथळ्यांची कल्पना देखील त्यांना आहे. मग ते परदेशी निर्मात्यांना गोव्यात कुठल्या भरवशावर निमंत्रण देऊ पाहत आहेत? की निमंत्रण द्यायला जाणे हे केवळ एक निमित्त आहे? कान्समध्ये जीवाची चैन‌ करायला जाणे हाच त्यांच्या सहलीचा खरा हेतू नाही ना असे अनेक प्रश्न ही पार्श्वभूमी पाहता अनेकांच्या मनात येऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT