Avoid Mobile Dainik Gomantak
गोवा

केरी सरकारी विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

पालक-शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे: नाईक

दैनिक गोमन्तक

पर्ये: कोविडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण हे मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने झाले. आता शाळा सुरू झाल्याने पूर्वीचे पारंपरिक पद्धतीचे वर्गातील शिक्षण सुरू झाले आहे. मात्र आता पालक आणि शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. ते पेलून मोबाईलच्या आहारी न जाणारी चांगली पिढी तयार घडवावी, असे प्रतिपादन सरकारी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकृष्णा नाईक यांनी केले. केरी-सत्तरीतील सरकारी माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा नुकताच येथील विद्यालय सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाईक उपस्थित होते. कोविड काळात शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

यावेळी केरी पंचायतीचे सरपंच दाऊद सय्यद, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मेल्विन डिकॉस्ता, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र हळीत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रेश्मा गावस, पालक-शिक्षक संघाचे सदस्य विष्णू च्यारी, दशरथ मोरजकर, गीतांजली गावस, प्रवीण राणे आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरकारी माध्यमिक विद्यालयातर्फे या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वास्कोतील कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न; बाथरुमची खिडकी तोडून प्रवेश

Goa Third District: कहीं ख़ुशी कहीं गम! कुशावतीबाबत धारबांदोड्यात संमिश्र प्रतिक्रिया; राजकीय हेतू, कागदपत्रांच्या अडचणींवरून विरोध

Goa Opinion: 'बर्च क्लब'प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अन्यथा गोव्यातील पर्यटन मान टाकेल आणि राज्य भयाण आर्थिक संकटात सापडेल..

Goa News: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! एससी-ओबीसी लाभार्थ्यांना दिलासा; थकीत कर्जावरील 3 कोटीच्या व्याजाची माफी

Mopa Airport: 2 ते 5 मिनिटांचा नियम जाचक! टॅक्सीचालकांत संताप; मोपा विमानतळावर ‘जीएमआर’च्या नव्या धोरणामुळे गोंधळ

SCROLL FOR NEXT