Goa Illegal Bar Row Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Bar Row: सिली सोल्स कॅफे आणि बार संबधित पुढील सुनावणी 22 ऑगस्टला

अबकारी आयुक्तांना उपस्थित केले दोन मुद्दे, परवानाधारकांना द्यावे लागणार उत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील बेकायदेशीर सिली सोल्स कॅफे आणि बार (Silly Souls Café and Bar) संबधित सुनावणी याच पार पडली. अबकारी आयुक्तांना उपस्थित केले दोन प्रमुख मुद्दे उपस्थित केले असून, परवाना धारकांकडे उत्तराची मागणी केली आहे. यासंबधित पुढील सुनावणी येत्या 22 ऑगस्टला होणार आहे. बेकायदेशीर सिली सोल्स कॅफे केंद्रिय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या मुलीशी निगडीत असून, त्याचा परवाना मृत व्यक्तीच्या नावावर रिन्यू केल्याचा आरोप याचिकाकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्ज (Adv. Aires Rodrigues) यांनी केला आहे.

अबकारी आयुक्तांनी आज सुनावणी सुरू झाल्यानंतर दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. यामध्ये खोटे आणि चुकिचे कागदपत्र दाखल करून परवाना मिळवला आहे का ? हा एक, आणि परवाना देताना कार्यपद्धतीत काय चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला आहे का? हा दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. परवाना धारकांना या दोन्ही मुद्दांवर उत्तर देण्याच्या सुचना आयुक्तांनी केल्या आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑगस्टला राखून ठेवण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

स्मृती इराणी यांच्या कुटुंबियांशी संबंधित रेस्टॉरंटला कायद्याचे उल्लंघन करून विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीसाठी परवाना जारी केल्याचा आरोप केला जात आहे. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आरटीआयद्वारे मागविलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने 18 फेब्रुवारी 2021 रोजी कायद्याचे उल्लंघन करून अँथनी डगमा यांच्या नावाने परवाना दिल्याचे आरटीआयमधून उघड झाले आहे. दरम्यान, अँथनी डगमा यांचे गेल्या वर्षी म्हणजेच 17 मे 2021 रोजी निधन झाले असतानाही त्यांच्या नावाने परवान्यांचे नूतनीकरण केले. असे कागदपत्रावरून दिसून येत आहे.

कायद्याचे उल्लंघन करून स्मृती इराणी कुटुंब चालवत असून, उत्पादन शुल्क अधिकारी आणि आसगाव पंचायत यांच्या संगनमताने केलेल्या या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj Record: सिराजने मोडला बुमराहचा विक्रम! 29 वर्षांनंतर 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

Goa News Live Update: आग्वाद येथे दोघांवर चाकू आणि कात्रीने हल्ला; तामिळनाडूच्या पाच जणांना अटक

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोमागे स्वार्थ?

"मानकुरादची नवी कलमे लावा, उत्‍पन्न वाढवा", CM सावंतांचं शेतकऱ्यांना आवाहन; प्रतिहेक्‍टर मिळतंय 2 लाख रुपयांचे अनुदान

Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

SCROLL FOR NEXT