Goa Covid-19 Test Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोना चाचणीसाठी अवाजवी बिल आकारणी? अधिकारी निवडणुकीत व्यस्त!

निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना 1500 ते 2000 रु. मोजावे लागत आहेत. ज्यामुळे लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Covid-19 Test: कोरोनामुळे संगळ्यांचेच आर्थिक बजेट कोलमडले आहे. दरम्यान प्रवासासाठी किंवा कामावर परतण्यासाठी कोविड-19 निगेटिव्ह प्रमाणपत्र (Covid Negative Report) देणे सगळीकडेच अनिवार्य आहे. परंतु आरोग्य क्षेत्रातील अव्वाच्या-सव्वा चाचणी बिलांनी गोव्यातले नागरिक मात्र हैराण झाले आहेत. (Excessive billing for corona test in Goa Officials busy with elections)

गोवा आरोग्य विभागातर्फे (Health Department Goa) याबाबतीत दखल घेत एक सार्वजनिक नोटिस जाहीर करण्यात आया होती. ज्यात कोरोना चाचण्यांचे दर कमी करण्यात आले होते. मात्र असे असूनही अजूनही गोव्यात कोरोना चाचणीसाठी अवाजवी बिल आकारणी होत आहे. फक्त निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना परत चाचणी करावी लागत आहे; आणि यासाठी त्यांना 1500 ते 2000 रु. मोजावे लागत आहेत. ज्यामुळे लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

आरोग्य विभागाकडून आलेली ही नोटीस सर्वच सरकारी आणि खाजगी चाचणी केंद्रांना लागू असूनही, यासंबंधी विचारणा केली असता काही खाजगी लॅबोरेटरी आपल्याला अशी कोणतीच नोटीस न मिळाल्याचे सांगत आहेत. तरी आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) आणि सर्व अधिकारी याकडे दुर्लक्ष करून सध्याच्या निवडणुकीत व्यस्त आहेत, त्यामुळे नागरिक वैतागले आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून यावर त्वरित तोडगा काढावा असा सूर त्रस्त नगरिकांमधून उमटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT