Student runs away to goa Dainik Gomantak
गोवा

'झोपतो म्हणून गेला, घरातले 3 लाख घेऊन गोव्याला पळाला'; परीक्षेच्या ताणामुळे गुजरातच्या विद्यार्थाने उचलले धक्कादायक पाऊल

Vadodara Student To Goa Beach: परीक्षेच्या ताणातून सुटका मिळवण्यासाठी वडोदरा येथील विद्यार्थ्याने घरातून थेट गोव्याकडे पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sameer Panditrao

वडोदरा: परीक्षेचा वाढता ताण आणि अभ्यासाचा दबाव अनेक विद्यार्थ्यांसाठी मानसिक आव्हान ठरत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये देशभरात दहावी-बारावी तसेच अन्य वर्गांच्या परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशाच परीक्षेच्या ताणातून सुटका मिळवण्यासाठी गुजरातच्या वडोदरा येथील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने घरातून तीन लाख रुपये घेऊन थेट गोव्याकडे पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

वडोदऱ्यातील समा-सावली रोड परिसरात राहणारा हा विद्यार्थी अकरावीत शिकत असून तो परीक्षेची तयारी करत होता. रात्री सुमारे बारा वाजता तो आई आणि बहिणीला झोपायला जात असल्याचे सांगून आपल्या खोलीत गेला.

मात्र, पहाटेपर्यंत तो खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी तपासणी केली असता तो गायब असल्याचे आढळले. घरातील तिजोरीतून तीन लाख रुपयेही गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली. विशेष म्हणजे, या रकमेत बहिणीच्या यूपीएससी परीक्षेसाठीची रक्कम होती.

शाळेत चौकशी केल्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षकांना त्या दिवशी वर्गाला येणार नसल्याचा निरोप दिल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १.४५ वाजता तो बॅग घेऊन घराबाहेर पडताना दिसून आला. पुढील तपासात तो टॅक्सीने मुंबईला गेला आणि तेथून एका मित्रासह गोव्याला गेल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्याजवळ त्याला आणि त्याच्या मित्राला सुरक्षित शोधून काढले. दोघांनी मिळून सुमारे ५० हजार रुपये खर्च केल्याचेही पोलिसांनी सांगितले. चौकशीत विद्यार्थ्याने परीक्षा आणि अभ्यासाच्या दबावामुळे मानसिक तणाव वाढल्याचे सांगितले. काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा घरी परतण्याचा त्याचा विचार होता, असेही त्याने कबूल केले.

पोलिसांनी विद्यार्थ्याची समुपदेशन (काऊन्सिलिंग) करून त्याला आणि त्याच्या मित्राला वडोदऱ्यात परत आणले व कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात कोणतीही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. मात्र, परीक्षेच्या ताणामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक परिणामांबाबत ही घटना गंभीर इशारा देणारी असल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT