Sudip Tamhankar: पाठलाग केला, लाथ मारून खाली पाडले; सुदीप ताम्हणकरांनी सांगितला हल्ल्याचा थरार Watch Video

Sudip Tamhankar Attack Video: ताम्हणकर दुचाकीवरून जात असताना संबंधितांनी त्यांचा पाठलाग करून मार्ग रोखला व गाडीवर लाथा मारत त्यांना जमिनीवर पाडले.
Sudip Tamhankar
Sudip TamhankarDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : अखिल गोवा खासगी बसमालक असोसिएशनचे नेते सुदीप ताम्हणकर यांना शनिवारी (२४ जानेवारी) दुपारी म्हापसा कदंब बस स्थानक परिसरात अज्ञात सात ते आठ जणांच्या गटाने अडवून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंदवून कर्नाटकातील सात जणांना अटक केली आहे.

ताम्हणकर दुचाकीवरून जात असताना संबंधितांनी त्यांचा पाठलाग करून मार्ग रोखला व गाडीवर लाथा मारत त्यांना जमिनीवर पाडले. या झटापटीत त्यांच्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली असून कपडे धुळीने माखले. घटनेनंतर ताम्हणकर यांनी स्वतःला सावरत थेट म्हापसा पोलिस स्थानक गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

ताम्हणकर यांनी आरोप केला की, एका खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस योग्य नोंदणीशिवाय बेकायदेशीररीत्या आंतरराज्य वाहतूक करत आहेत. ‘लिव्ह अँड लायसन्स’ या पद्धतीखाली दीड लाख रुपये घेऊन बोगस घर क्रमांकावर बस नोंदविल्या जात असून, हे एक मोठे रॅकेट आहे, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Sudip Tamhankar
Sudip Tamhankar Attack: म्हापशात खळबळ! बसमालक नेते सुदीप ताम्हणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं गाठलं

शनिवारी दुपारी अनधिकृत वाहतूक सेवेविरोधात माध्यमांसमोर भूमिका मांडल्यानंतर ताम्हणकर म्हापसा कदंब बस स्थानकावरून परत जात असताना संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीच्या काही चालक व वाहकांनी त्यांना अडवले. या गटाने दुचाकीवर लाथा मारल्या तसेच ताम्हणकर व त्यांच्या वाहनाचे फोटो काढले. काहीजणांनी संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केल्याचा आरोपही ताम्हणकर यांनी केला.

Sudip Tamhankar
Goa Crime: गोवा हादरला! दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; नराधम बाप-लेकाला म्हापसा पोलिसांकडून अटक

या घटनेमुळे आपल्याच्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत, “हे सर्व बसवाले बाहेरचे असून भविष्यात सुपारी देऊन हल्ला होऊ शकतो,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी ताम्हणकर यांना जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. उपचारानंतर ते घरी परतले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन न्याय मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com