Goa CM In Karnataka 
गोवा

Goa CM In Karnataka: कुमारस्वामींचा अर्ज दाखल करण्यासाठी सीएम सावंत सीमापार; सोबतीला येडियुरप्पा आणि तेजस्वी सूर्या

Goa CM In Karnataka: भाजप कर्नाटकमध्ये सर्व 28 जागा जिंकेल असा, विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

Pramod Yadav

Goa CM In Karnataka

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी आज (दि.04) अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. कर्नाटकात 28 जागांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु झाली असून, कर्नाटकातील भाजप-जेडीएस युतीचे उमेदवार एच. डी. कुमारस्वामी यांनी मंड्या मंतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस, येडियुरप्पा आणि तेजस्वी सूर्या हजर होते. मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान एडी देवेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कर्नाटकमध्ये सर्व 28 जागा जिंकेल असा, विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज (दि.०४) सकाळी कर्नाटकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे बंगळुरुचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी स्वागत केले. सावंत यांनी तेजस्वी सूर्या यांच्यासोबत डोश्यावर ताव मारला. याचे फोटो देखील सावंत यांनी शेअर केले आहेत.

कर्नाटकमध्ये २८ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २६ एप्रिल रोजी राज्यातील विविध मतदारसंघासाठी मतदान होईल तर, सात मे रोजी उरलेल्या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT