Shivani and His Father Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: लग्‍न होऊन आठवडा उलटण्‍यापूर्वीच शिवानीला केला भयंकर सासुरवास

Shivani Death Case in Goa: वास्‍को जळीत प्रकरण : क्षुल्लक गोष्‍टींसाठी केला जाच

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

Shivani Death Case in Vasco Goa: नवेवाडे-वास्‍को येथे गॅस स्‍फाेटात मरण पावलेल्‍या शिवानी राजवत या नवविवाहितेला लग्‍न होऊन एक आठवडाही झाला नसताना सासरच्‍या लोकांच्‍या मानसिक छळाला सामोरे जावे लागले होते.

16 लाख रुपये रोख, दागदागिने आणि अन्‍य घरगुती वस्‍तू असा घसघशीत हुंडा दिला असतानाही सुनेने हुंडा कमी आणला, यासाठी सासूकडून सतत टोमणे मारले जायचे.

वास्‍को येेथे शिवानी राजवत आणि तिची आई जयदेवी चौहान यांचा जळून झालेला मृत्‍यू हा अपघात की घातपात याबद्दल अजूनही तपास यंत्रणांना सुगावा लागलेला नाही. पण शिवानीच्‍या घरच्‍या लोकांकडून हा घातपाताचाच प्रकार असल्‍याचा दावा केला जात आहे.

सासरच्‍या लाेकांकडून शिवानीचा हुंड्यासाठी होणारा मानसिक छळ हे त्‍यामागचे मुख्‍य कारण असल्‍याचे सांगितले जाते. उज्‍जैन-मध्‍य प्रदेश येथे पोलिस खात्यात काम करणारा शिवानीचा भाऊ शुभम चौहान याने ‘दै. गोमन्‍तक’शी संवाद साधताना सांगितले की, शिवानीचे लग्‍न अनुरागशी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले.

लग्‍न होऊन दोन दिवसही उलटले नसताना शिवानीने हुंड्यातील वस्तू कमी आणल्या म्‍हणून तिला सासरच्‍या लोकांची बाेलणी खावी लागली होती. वास्‍तविक या वस्तू सासरच्‍याच लाेकांकडे होत्या. मात्र, त्‍यांना त्या सापडत नव्‍हत्या. त्‍याचा आळ सासरच्‍या लोकांनी आपल्‍या बहिणीवर घातला,

असे शुभमने सांगितले. हुंड्यामध्ये जो एसी दिला होता, ताे काही महिन्‍यांनी नादुरुस्‍त झाल्‍यावरही सासूने कमी दर्जाचा एसी दिला, असे टोमणे मारले होते. त्यामुळे माझी बहीण सासरी नेहमीच तणावाखाली वावरत हाेती, असे त्‍याने सांगितले.

अनुराग राजवत याचे मूळ घर ग्‍वाल्‍हेर (मध्‍य प्रदेश) येथे असून सासरी शिवाणीला जेवणही व्‍यवस्‍थित दिले जात नसे. जून २०२३ मध्‍ये अनुराग तिला गोव्‍यात घेऊन आला, त्‍यानंतर ती गरोदरही राहिली.

मात्र, गरोदरपणात तिला काही खायची इच्‍छा झाल्‍यास सासू तिला खाण्‍याची ती वस्‍तू मिळणार नाही, असे सांगायची. कित्‍येकदा शिवानी फोनवर रडत रडत मला या गोष्‍टी सांगायची. मात्र, मी सासरच्‍या लोकांशी जुळवून घे असे सांगून तिला शांत करायचो, असे तो म्‍हणाला.

शिवानीचे वडील दिलीपसिंह चौहान यांनी गोव्‍याच्‍या मुख्‍यमंत्र्यांना जे पत्र लिहिले आहे, त्‍यामध्‍येही मुलीच्‍या लग्‍नात १२ लाख रुपये रोख, दागदागिने आणि गृहोपयोगी साहित्य हुंडा म्‍हणून दिले होते.

असे असतानाही लग्‍न होऊन चार-पाच महिन्‍यांतच हुंडा कमी आणला म्‍हणून सासूकडून मानसिक छळ होतो आणि खायलाही चांगले देत नाहीत, अशी तक्रार शिवानीने केली होती. याबद्दल अनुरागला काही सांगितल्‍यास तो त्याच्या आईचीच बाजू घ्‍यायचा.

त्‍यामुळे हा मृत्‍यू म्‍हणजे हुंडाबळीचा प्रकार असल्याचा आरोप त्‍यांनी केला असून या बाजूने या जळीत प्रकरणाचा तपास करावा, असे म्‍हटले आहे.

शिवानीला माहेरी पाठविण्‍यास विरोध

शिवानीची आई तिला माहेरी घेऊन येणार होती. मात्र, तिला माहेरी न पाठविता सासरीच ठेवून घेण्‍याचा अनुराग आणि तिच्‍या आईचा हट्ट होता. तिला आईने माहेरी घेऊन न जाता सासरीच ठेवावे, यासाठी अनुरागच्‍या एका नातलगाचा मला १७ नोव्‍हेंबरला रात्री फोन आला होता. मात्र, शिवानीला विचारून काय तो निर्णय घ्‍या, असे मी त्‍यांना सांगितले होते, असे शुभमने सांगितले.

प्रवासाबाबत गोपनीयता

शिवानीचे माहेर मध्‍य प्रदेशातील मुरैना जिल्‍ह्यात असून ज्‍या दिवशी ही दुर्घटना घडली, त्‍या दिवशी ती आणि तिची आई दोघीही अनुरागसोबत मध्‍य प्रदेशला जाणार होत्या. त्‍यासाठी अनुरागने रेल्‍वेचे रिझर्वेशनही केले होते.

मात्र, गोव्‍यातून १८ तारखेला निघणार ही माहिती त्‍याने कोणालाही दिली नव्‍हती, असे शुभम सिंग याने सांगितले. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय आहे.

7 डिसेंबरला वडील, भावाची जबानी

याप्रकरणी कोणावर गुन्‍हा नोंद करायचा की नाही, हे तक्रार आल्‍यानंतरच ठरवता येईल, असे पोलिसांनी सांगितले. शिवानीचा हुंड्यासाठी छळ झाला होता का, याची चौकशी उपजिल्‍हाधिकारी भगवंत करमली करत असून शिवानीचे वडील आणि भावाला ७ डिसेंबर रोजी जबानीसाठी बोलावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

SCROLL FOR NEXT