Ethan Vaz Dainik Gomantak
गोवा

Ethan Vaz: गोव्याचा एथन वाझ बनला सक्रिय युवा ग्रँडमास्टर!वयाच्‍या 14 व्या वर्षी तिसऱ्या नॉर्मची पूर्तता; देशाचा 96 वा बुद्धिबळपटू

Ethan Vaz Grandmaster: प्रतिभाशाली बुद्धिबळपटू एथन वाझ याने शनिवारी गोमंतकीय बुद्धिबळात नवा पराक्रम रचला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: प्रतिभाशाली बुद्धिबळपटू एथन वाझ याने शनिवारी गोमंतकीय बुद्धिबळात नवा पराक्रम रचला. वयाच्या चौदाव्या वर्षी तो भारतातील ९६वा, तर सध्‍याच्‍या सक्रिय बुद्धिबळपटूंत देशात सर्वांत युवा ग्रँडमास्टर ठरला. या किताबासाठी त्याने आवश्यक तिन्ही नॉर्म प्राप्त केले.

बोस्निया-हर्झेगोविना येथे शनिवारी संपलेल्या ‘चेस समर इन साराजेव्हो - जीएम मिक्स’ या स्पर्धेत एथन याने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक तिसरा नॉर्म प्राप्त केला. या स्पर्धेत त्याने विजेतेपदही प्राप्त केले.

ग्रँडमास्टर किताबाच्या तिसऱ्या नॉर्मसह एथन सध्याच्या सक्रिय बुद्धिबळपटूंत भारताचा सर्वांत युवा ग्रँडमास्टर, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा युवा ग्रँडमास्टर खेळाडू ठरला असल्याची माहिती एथनचे वडील एडविन वाझ यांनी दिली. एथनने क्लासिकल बुद्धिबळात मार्चमध्ये २५२२ हे सर्वोत्तम एलो रेटिंग प्राप्त केले होते. अनुराग म्हामल व लिऑन मेंडोन्सा यांच्यानंतर आता एथन गोव्याचा तिसरा ग्रँडमास्टर असेल.

यापूर्वी गोव्याचा सर्वांत युवा ‘आयएम’

एथन हाच गोव्याचा सर्वांत युवा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटूही आहे. जानेवारी २०२४ मध्ये तो आयएम किताबासाठी पात्र ठरला तेव्हा त्याचे वय १२ वर्षे व ४ महिने इतके होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT