Goa Crime Police Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ‘एस्‍कॉर्ट’वर गोव्‍याबाहेरूनच नियंत्रण; संशयितांना पोलिस कोठडी

Colva Escort Case: बेताळभाटी येथे घेऊन जाण्‍यासाठी अन्‍य दोन संशयितांना संबंधित ‘अज्ञात’ नियंत्रकांकडून सूचना आल्‍या होत्‍या

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोव्‍याबाहेरील मुलींना गोव्‍यात आणून त्‍यांचा एस्‍काॅर्ट म्‍हणून वापर केला जात असला तरी या एस्‍काॅर्ट सेवेवर गोव्‍याबाहेरूनच नियंत्रण ठेवले जाते हे आता कोलव्‍यातील एस्‍काॅर्ट प्रकरणामुळे पुन्‍हा एकदा समोर आले आहे. बेताळभाटी येथे एका फ्‍लॅटवर पाठविलेल्‍या दोन एस्‍काॅर्टना गोव्‍याबाहेरूनच नियंत्रित केले जात होते, अशी माहिती आता पुढे आली आहे.

या प्रकरणात काल काेलवा पोलिसांनी विकास राय, शिवम सिंग (दोघेही उत्तर प्रदेश) यांच्‍यासह माधुरी कुमारी (उत्तर प्रदेश) आणि रेणू देवी (बिहार) या चारजणांना अटक केली होती. आज या चारही संशयितांना मडगाव न्‍यायालयासमोर हजर केले असता त्‍यांना तीन दिवसांच्‍या पाेलिस कोठडीचा रिमांड देण्‍यात आला.

या प्रकरणातील तक्रारदार असलेल्‍या सुफियान ब्‍याडगी या १९ वर्षीय युवकाने वेबसाईटवरून या एस्‍काॅर्ट सेवेशी संपर्क साधला हाेता. त्‍यावेळी विकास राय व शिवम सिंग या दोघांनी वरील दोन युवतींना ब्‍याडगी याच्‍या फ्‍लॅटवर आणले होते. त्‍यावेळी या चौघांनी त्‍याच्‍याकडून अतिरिक्‍त पैसे उकळण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यामुळे या प्रकरणाचा बोभाटा झाला होता.

ज्‍या युवतींना रात्रीच्‍यावेळी एस्‍काॅर्ट सेवा देण्‍याच्‍या बहाण्‍याने बेताळभाटी येथे आणण्‍यात आले, त्‍या युवतींना उत्तर गोव्‍यात एकीकडे ठेवण्‍यात आले होते. त्‍या युवतींना बेताळभाटी येथे घेऊन जाण्‍यासाठी अन्‍य दोन संशयितांना संबंधित ‘अज्ञात’ नियंत्रकांकडून सूचना आल्‍या होत्‍या.

त्‍यानुसार या युवतींना बेताळभाटी येथे आणण्‍यात आले, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, त्‍या अज्ञात नियंत्रकाने या सूचना नेमक्‍या कुठून दिल्‍या याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT