Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: चर्चिल यांनी भाजपमध्ये यावे आलेक्स सिक्वेरा यांचे विधान

Goa Politics: माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बाहेर राहून स्तुतिसुमने उधळण्यापेक्षा त्यांनी भाजपमध्ये यावे, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बाहेर राहून स्तुतिसुमने उधळण्यापेक्षा त्यांनी भाजपमध्ये यावे, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी म्हटले आहे. यापूर्वीही आपण तसा प्रस्ताव जाहीरपणे त्यांना दिला होता, असेही त्यांनी हसत हसत सांगितले.

मंत्रालयात त्यांचे लक्ष आलेमाव यांच्या वक्तव्याकडे वेधले असता ते म्हणाले, मी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये मोदी यांच्या कार्यशैलीमुळेच प्रवेश केला. जनतेच्या आशा आकाक्षांची पूर्ती करण्याची ताकद त्यांच्या नेतृत्वात आहे.

त्यांनी मडगावात सभा घेतली आणि दक्षिण गोव्यातील वातावरणच बदलले आहे. भाजपचा उमेदवार दक्षिण गोव्यातून विजयी होईल. मी भाजपमध्ये आलो म्हणून नव्हे तर भाजपसाठी आधीपासूनच अनुकूल वातावरण आहे.

माझ्यासोबत तेव्हा असलेले आजही माझ्यासोबत आहेत, असे सिक्वेरा म्हणाले.

रेतीसाठी नियमांत दुरुस्ती...

रेती काढण्यासाठी परवाने देण्यासाठी काही नियमांत दुरुस्ती करावी लागणार आहे. ती गोष्ट एका रात्रीत होऊ शकत नाही. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली, तर हे काम रेंगाळू शकते. पश्चिम घाटातील पर्यावरणाचे संरक्षण करताना अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानाबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, ही आमची भूमिका आहे, असे सिक्वेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT