ED Arrest Two in Goa for Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grabbing Case: गोव्यातील जमीन हडप प्रकरणी ईडीकडून दोघांना अटक, ED कोठडीत रवानगी

Goa Land Grabbing Case News: संशयित आरोपींच्या नावे झालेल्या विविध स्थावर मालमत्ता बेकायदेशीरपणे मिळवल्याचे ईडीच्या तपासात असे समोर आले आहे.

Pramod Yadav

Goa Land Grabbing Case ED Arrest Two

गोव्यातील जमीन हडप प्रकरणी ईडीने दोघांना अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) विक्रांत शेट्टी आणि राजकुमार मैथी यांना 15 फेब्रुवारी रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA), 2002 च्या तरतुदींनुसार गोव्यातील जमीन हडप केल्याप्रकरणी अटक केली आहे.

पीएमएलए कोर्टाने त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

गोव्यातील जमीन हडप प्रकरणी विक्रांत शेट्टी, मोहम्मद सुहेल, राजकुमार मैथी आणि इतर आरोपींविरुद्ध गोवा पोलिसांनी दाखल केलेल्या विविध एफआयआरच्या आधारे ED ने पास सुरू केला होता.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने गोवा पोलिसांची एसआयटीही स्थापन केली असून, एसआयटीच या प्रकरणाचा तपास करत आहे.

संशयित आरोपींच्या नावे झालेल्या विविध स्थावर मालमत्ता बेकायदेशीरपणे मिळवल्याचे ईडीच्या तपासात असे समोर आले आहे.

स्थावर मालमत्ता त्यांच्या पूर्वजांची असल्याचे सिद्ध करण्यासाठी आरोपींनी जमीन अभिलेखात बनावट कागदपत्रे सादर केली. या बनावट दस्तऐवजांच्या आधारे, त्यांनी जमिनीच्या नोंदी अद्ययावत केल्याचे तपासातून समोर आले.

यातील काही मालमत्ता आरोपींनी गोवा आणि इतर राज्यातील खरेदीदारांना विकल्या होत्या. या प्रकरणी यापूर्वीच अटॅचमेंट ऑर्डर जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये 39.24 कोटी रुपयांच्या 31 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपी विक्रांत शेट्टी आणि राजकुमार मैथी आणि इतर साथीदारांनी जमिनीच्या खोट्या नोंदी करून गोव्यात मोठ्या प्रमाणावर जमीन बेकायदेशीरपणे हडप केल्याचे तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT