Panchayat  Dainik Gomantak
गोवा

पंच सदस्याकडून पदपथावर अतिक्रमण

पंचायतीकडून डोळेझाक: तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी: अतिक्रमणाविरुद्ध कारवाईसाठी ठराव घेणारे पंच सदस्य स्वतः अतिक्रमण करत असले, तरी त्याविरुद्ध पंचायतीकडून कारवाई केली जात नाही. असाच प्रकार सांताक्रुझ पंचायतीचे प्रभाग 3 मधील सदस्य लॉरेन्स रॉड्रिग्ज यांनी पदपथावर अतिक्रमण करून निवारा (शेड) उभारली आहे. याप्रकरणी स्थानिक मिल्टन आरावजो यांनी पंचायतीकडे तक्रार दाखल केली आहे. मात्रस अजूनही त्यांना पंचायतीकडून नोटीस बजावली गेली नाही.

सांताक्रुझ - बांबोळी या जुन्या रस्त्याच्या बाजूला पंच सदस्य लॉरेन्स रॉड्रिग्ज यांचे घर व कंपाऊंड आहे. या कंपाऊंडच्या बाहेर पदपथावर दोन्ही बाजूने शेड उभारण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या शेडचा वापर दुकान थाटण्यास देण्यात आला होता.

तक्रार दाखल झाल्यानंतर ते हटविण्यात आले. या शेडमुळे पदपथावरून चालण्यास पादचाऱ्यांना अडथळे येत आहेत. या शेडमुळे वाहन चालकांनाही समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचा संभव आहे. त्यामुळे या शेडविरोधात पंचायतीने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आरावजो यांनी तक्रारीत केली आहे.

सांताक्रुझ मार्केट ते ग्रीन व्हॅली जंक्शनवर रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्यावेळी गाडे उभे करून खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. या खाद्यपदार्थासाठी अनेकजण वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करून ठेवत असल्याने दुतर्फा मार्गावरील रस्त्यावर वाहनांची कोंडी होते तसेच अपघाताचा धोका संभवू शकतो. स्थानिक पंच सदस्य मात्र त्याकडे डोळेझाक करत आहेत. सुट्टीच्या दिवशी रस्त्यावर काहीजण पंचायतीची परवानगी नसतानाही चर खोदतात व ते बुजविले जात नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यातून जावे लागते. हल्लीच या भागातील रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर रस्त्यावर चर खोदण्याचे प्रकारघडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT