Encroachment in Bambolim Dainik Gomantak
गोवा

Encroachment in Bambolim : बांबोळीतील गाडेधारकांचे अतिक्रमण हटवलं

उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; पंचायतीच्या तक्रारीची अखेर घेतली गेली दखल

गोमन्तक डिजिटल टीम

Encroachment in Bambolim : दिनदयाळ रोजगार योजनेतून बांबोळीत गोमेकॉ परिसरात गाडे घालण्यास मिळालेल्या चार गाळेधारकांनी नुकत्याच स्थलांतरित झालेल्या जागेवर अतिक्रमण केले होते. सांताक्रुझ पंचायतीने या अतिक्रमणाविषयी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ते अतिक्रमण हटविण्याचे आदेश आल्यानंतर पंचायतीने ते अतिक्रमण हटविले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात दिनदयाळ रोजगार योजनेतून चारजणांना गोमेकॉच्या आवारात गाडे घालण्यास परवानगी दिली होती. परंतु त्यानंतर हळूहळू गाडेधारकांची संख्या 30 च्यावर गेली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला विक्रेते बसू लागले. त्यामुळे गोमेकॉमध्ये येणाऱ्या रुग्णवाहिकांना याचा अडथळा होऊ लागला. त्यामुळे गोमेकॉ प्रशासनाने सांताक्रुझ पंचायतीकडे वारंवार तक्रार केल्यानंतर पंचायतीने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे ही बाब मांडली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील दुकाने हटविण्यात आली.

दुकानांचा हक्क देताना मुख्यमंत्र्यांनी दुकानगाळ्यात बसूनच व्यापार करावा, रस्त्यावर दुकाने थाटू नयेत, असे सुचविले होते. परंतु त्यानंतरही त्याकडे विक्रेत्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे सांताक्रुझ पंचायतीने या अतिक्रमण धारकांना तोंडी तसेच अतिक्रमण काढण्याबाबत लेखी सूचनाही दिली. अखेर पंचायतीने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार अखेर आज त्यांच्यावर पंचायतीने कारवाई केली. काही गाडेधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT