Panjim Altinho Encroachment Dainik Gomantak
गोवा

Goa Encroachment: अतिक्रमणधारकांनी स्वतःहून हटविली घरे!

गोमन्तक डिजिटल टीम

आल्तिनो येथे एका खासगी जागेत उभारलेली घरे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या घरमालकांनीच स्वतःहून ती गुरुवारी सकाळी हटविली. मिळालेल्या माहितीनुसार गणेश मंदिराच्या मागील बाजूला खासगी जागा आहे, त्या जागेवर चार घरे अनधिकृतपणे उभारली गेली होती.

२००८ पासून ही घरे येथे अस्तित्वात होती. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण करणाऱ्यांनी खासगी जागा सोडली नाही. अखेर जागा मालकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. उच्च न्यायालयाने जागा मालकाच्या बाजूने निकाल दिल्याने महानगरपालिकेला ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश बजावले होते.

न्यायालयाने दिलेल्या आठवड्याच्या मुदतीनंतर त्या अतिक्रमणधारकांनी महानगरपालिकेला एक महिन्याची मुदत मागितली. आम्ही स्वतःहून ती घरे हटवितो, असे त्यांनी महानगरपालिकेला लेखी दिले.

महानगरपालिकेने एक घर पाडण्यासाठी ५० हजार रुपये दंड आकारला जाईल, असे सांगितले होते, परंतु मुदत मागून त्यांनी त्या मुदतीपूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत घरे पाडली. विशेष बाब म्हणजे या घरातील एक युवक पोलिसांत भरती झालेला आहे. पत्र्याच्या झोपड्या आता पक्के बांधकाम!

अनेक वर्षांपासून ती चार कुटुंबे तेथे राहत होती, परंतु पावसाळ्यात त्यांनी स्वतः घर पाडल्याने हा चर्चेचा विषय ठरला. महत्त्वाची बाब म्हणजे या घरांना वीज-पाणी जोडणी मिळाली होती, परंतु महानगरपालिका अतिक्रमण असल्याने त्यांच्याकडून करही वसूल करू शकत नव्हती.

आता अशाचप्रकारे त्या ठिकाणापासून काही अंतरावर आणखी एक वस्ती वाढली आहे, तीही बेकायदेशीर आहे. २०१९ मध्ये कोरोना आला होता, तेव्हा येथे पत्र्याच्या झोपड्या होत्या. परंतु आता याठिकाणी एकमजली इमारत उभी राहून त्यात वातानुकूलित यंत्रणा, वीज-पाणी, शौचालये अशा सर्व सुविधा दिल्या गेल्या आहेत. या बेकायदेशीर घरांना राजकारण्यांचे अभय असल्याचे सर्रासपणे सांगितले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT