Small Business In Goa Dainik Gomantak
गोवा

Small Business In Goa: ग्रामीण लघुउद्योजकांचे होणार सक्षमीकरण

Small Business In Goa: पाळी कोठंबीत कार्यक्रम: सुलक्षणा सावंत उद्‍घाटक

दैनिक गोमन्तक

Small Business In Goa: राज्यातील लघुउद्योजक महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध संघटनांच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून 27 ऑक्टोबर रोजी पाळी कोटुंबी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे उद्‍घाटन पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला सनदी अधिकारी भूषण सावईकर, ‘असोचेम’च्या महिला विंगच्या अध्यक्ष पल्लवी साळगावकर, आणि सोनम भगत उपस्थित राहणार आहेत.

असोचेम, गोवा राज्य विकास परिषद, वायजीआर न्यूज अँड मीडिया आणि जिल्हा ग्रामीण विकास संस्था (डीआरडीए), गोवा सरकार पहिल्यांदाच ‘डिजिटल वर्ल्ड टूवर्ड्स ग्रामीण-आंत्रप्रेन्युअर्स’ सक्षमीकरण करणे या अनोख्या कार्यक्रमासाठी एकत्र येत आहेत.

गोव्याचे तरुण डिजिटल-जाणकार विद्यार्थी स्वयंसेवक पुढील 45 ते 60 दिवसांत गोव्यातील उद्योजक डिजिटल-गरजू ग्रामीण उद्योजकांना ऑनलाईन आणतील.

गोव्याच्या तरुणांची खरी शक्ती दाखवून ते गोव्याचा ग्रामीण विकासासाठी सक्रिय असतील. पाळी कोठंबी येथे हा प्रायोगिक उपक्रम राबवला जाणार आहे. नारायण झांट्ये कॉलेजचे विद्यार्थी यासाठी प्रयत्न करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Pig Transport: कर्नाटकातून गोव्यात 53 डुकरांची बेकायदेशीर वाहतूक! अमानवीय वागणूकीचा ठपका; युवकाला दंड

Parra Crime: मारहाण करत जीवे घेण्याची दिली धमकी, कार-मोबाईलची नासधूस; पूर्ववैमनस्यातून राडा, दोघांना अटक

Mirabag: '..आम्ही रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ'! जुवारी नदीवरील बंधाऱ्याविरोधात एल्गार, मिराबाग येथे ग्रामस्थांची बैठक

Ranji Trophy 2026: ऋतुराज गायकवाडचे झुंजार अर्धशतक, अर्जुन तेंडुलकरचे 2 बळी; गोव्याविरुद्ध महाराष्ट्र शतकी आघाडीच्या दिशेने

Goa Crime: 'पैसे भरा, भरपूर व्याज देऊ'! गुंतवणूकदारांना घातला 1.69 कोटींचा गंडा; हरिओम पतसंस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक

SCROLL FOR NEXT