National Games Goa 2023: दुपारी 1 वाजता सरकारी कार्यालये बंद; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारचा निर्णय

National Games Goa 2023: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होत आहे.
National Games Goa 2023
National Games Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

National Games Goa 2023: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुरुवारी सर्व सरकारी कार्यालये दुपारी 1 नंतर बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

National Games Goa 2023
Goa Assembly Election: फोंड्यात विधानसभा निवडणुकीचे नियोजन सुरू

तसा अध्यादेश सार्वजनिक प्रशासन विभागाच्या सचिव शैला भोसले यांनी आज काढला. गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन होणार आहे. यासाठी पंतप्रधान दाबोळी विमानतळावर 6 वाजता उतरून रस्तामार्गे फातोर्डा स्टेडियमवर जाणार आहेत.

त्यादरम्यानच्या काळात दाबोळी विमानतळ-वेर्णा सर्कल-मडगाव जंक्शन आणि फातोर्डा स्टेडियमपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तशा सूचना विशेष सुरक्षा यंत्रणेने दिल्या होत्या. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी थांबवल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्यातील सर्व सरकारी कार्यालये दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जे सरकारी कर्मचारी दक्षिण गोव्यात राहतात आणि उत्तर गोव्यात काम करतात, त्यांना काम झाल्यानंतर दक्षिण गोव्यात जावेच लागते.

National Games Goa 2023
National Games Goa 2023: गोवा मुक्तीनंतर प्रथमच राज्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी...

यासाठी सरकारने गुरुवारी सर्व सरकारी कार्यालये दुपारी १ नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सर्व कर्मचाऱ्यांना घरी तातडीने जाण्यास सांगितले असून अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, अशा सूचना नागरिकांना केल्या आहेत. तसा अध्यादेशही काढला आहे.

हेलिकॉप्टर वापरावर मर्यादा

सर्वसाधारणपणे संरक्षण दलाची सर्वच हेलिकॉप्टर्स सूर्यास्तानंतर वापरली जात नाहीत. त्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या हेलिकॉप्टरच्या वापरावरही अनेक निर्बंध आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा सायंकाळी 6 वाजल्यानंतरचा असल्याने यादरम्यानच्या काळात हेलिकॉप्टर वापरावर अनेक मर्यादा आहेत. याकरताच पंतप्रधान रस्तामार्गे उदघाटन स्थळी जाणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com