'Emergency Black Day' in goa Dainik Gomantak
गोवा

भाजयुमो वास्कोतर्फे 'आणीबाणी काळा दिन'चे आयोजन

आमदार कृष्णा साळकर यांनी लोकांनी त्याकाळची काँग्रेस राजवट व प्रंतप्रधान नरेंद्र मोदी सध्याची राजवट यांची तुलना करण्याची गरज असल्याचे सांगितले.

दैनिक गोमन्तक

वास्को: काँग्रेसने 47 वर्षांपूर्वी देशात लागू केलेल्या आणीबाणीसंबंधी आजच्या युवकांना माहिती असणे गरजेचे असल्याने भाजयुमो वास्कोतर्फे 'आणीबाणी काळा दिन'चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार कृष्णा साळकर यांनी लोकांनी त्याकाळची काँग्रेस राजवट व प्रंतप्रधान नरेंद्र मोदी सध्याची राजवट यांची तुलना करण्याची गरज असल्याचे सांगितले.

('Emergency Black Day' in goa)

या कार्यक्रमाला भाजपा वास्को मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, प्रशांत नार्वेकर, रुपेश पालयेकर,दामोदर लोटलीकर, रिमा सोनुर्लेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 ला देशात आणीबाणी घोषीत केली होती. सर्वसामान्यांचे जीवन दयनीय करण्यात आले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली होती. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना शिक्षा केली जात होती. आणीबाणीचे 21 महिने हे अत्याचार जनतेने सहन केले होते. ते कधीच विसरता येणार नाही. कधीही माफ करता येणार नाही, असे साळकर यांनी सांगितले.

वास्कोतील काही काँग्रेसवाले विविध कामांचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात, अस दावा त्यांनी केला. काँग्रेसवाल्यांनी विरोधासाठी विरोध करणे बंद करावे. काँग्रेस संपण्याच्या वाटेवर असल्याचे ते म्हणाले.

आणीबाणीतील अत्याचा आजच्या युवकांसमोर येण्याची गरज असल्याचे दीपक नाईक यांनी सांगितले. जयंत जाधव यांनी इंदिर गांधी यांनी आणीबाणी का लाग केली. त्या आणीबाणीचे कोणते परिणाम झाले. त्या आणीबाणील विरोधक कसे सामोरे गेले यासंबंध थोडक्यात माहिती दिली. प्रशांत नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. रिमा सोनुर्लेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT