पोलिस भरती प्रक्रिया नव्‍याने सुरू करा; विकास भगत यांची मागणी

पक्षाच्‍या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Goa police
Goa policeDainik Gomantak 

पणजी: पोलिस उपनिरीक्षक भरतीत आर्थिक घोटाळा झाला आहे. यामुळे सरकारने ही भरती रद्द करून भरती प्रक्रिया नव्‍याने सुरू करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्‍या पर्यावरण विभागाचे समन्‍वयक विकास भगत यांनी केली. पक्षाच्‍या येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(Start goa police recruitment process anew Demand of Vikas Bhagat)

Goa police
अंगणवाडी सेविकांना सेवेत रुजू करा; काँग्रेसची मागणी

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज केलेल्‍या युवकांची शारीरिक चाचणी झाली. तसेच लेखी परीक्षाही झाली. या दोन्‍ही परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्‍या युवकांनाही पोलिस उपनिरीक्षक म्‍हणून भरती करण्यात येत आहे. यात भाजप केडरमधील युवकांचा समावेश आहे. तसेच भाजपा आपल्‍या नात्‍या-गोत्‍यांतील युवकांची भरती करत आहे.

राज्‍यातील सत्ताधारी भाजपा सरकारने पक्षाचे हित न पाहता गोमंतकीय युवकांचे हित सांभाळावे. प्रवेश परीक्षांमध्ये अुनत्तीर्ण होणाऱ्यांकडून पैसे घेऊन पोलिस उपनिरीक्षक म्‍हणून भरती केली, तर त्‍यांच्‍याकडून प्रामाणिक कामाची अपेक्षा ठेवता येणार नाही. यामुळे राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था आणखी धोक्यात येईल, असे भगत म्‍हणाले.

Goa police
आता घरबसल्या जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर

‘सरकारचा दुटप्पीपणा’ : एकीकडे भरती प्रक्रियेची चौकशी सुरू आहे म्‍हणून सांगायचे आणि दुसरीकडे चाचण्या पूर्ण केलेल्‍या युवकांना मूळ कागदपत्रे सादर करा, म्‍हणून कळवायचे. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. यामुळे नेमके काय चालले आहे, हेच कळत नाही. यासाठी सरकारने पोलिस उपनिरीक्षक पदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून ती नव्‍याने सुरू करावी, अशी मागणी भगत यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com