Dainik Gomantak
गोवा

Goa News: एल्‍टन डिकॉस्‍ता यांनी पंचायतीचे सभागृह बुक केलेच नव्‍हते !

Goa News: आंबावली सरपंच : आमदार खोटे बोलत असल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

Goa News: आमदार एल्टन डिकाॅस्‍ता यांनी आंबावली पंचायत मंडळावर केलेला आरोप खोटा असून त्यांनी पंचायतीकडे सभागृह बुकिंगसाठी कोणताच अर्ज केला नव्हता. उलट त्यांना पंचायत कार्यालय कोणत्या ठिकाणी चालते हेही माहीत नाही, असे सरपंच विकास देईकर यांनी आंबावली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी उपसरपंच सेबेस्तिना रिबेलो, पंच रानिया कार्दोज व प्रीती गावकर उपस्थित होते. सोमवार, २९ रोजी एल्टन डिकाॅस्‍ता यांनी आंबावली केपे येथे आधार कार्ड शिबिरासाठी आपण पंचायत सभागृह मागितले होते,

पण पंच मंडळाने मुद्दामहून सदर सभागृह दिले नव्हते, असा आरोप केला होता. नंतर हे शिबिर बंद असलेल्या प्राथमिक शाळेत हलविले होते. यावेळी त्यांच्याबरोबर युरी आलेमावही हजर होते. सदर शिबिरासाठी २४ रोजी डिकाॅस्‍ता यांनी आपल्याला फोन केला होता.

पण सभागृह बुकिंग केले नव्हते. हे शिबिर फेब्रुवारीत घ्यावे, असे सांगितले. पण त्यांनी तसे न करता शाळेचे कुलूप तोडून शिबिर घेतले होते, असे देईकर यांनी सांगितले.

डिकॉस्टांना पंचायत कुठे हेही माहीत नाही!

एल्टन डिकाॅस्‍ता हे आमदार झाल्यास दोन वर्षे उलटली तरी त्यांनी कधीच या पंचायतीत पाय ठेवला नव्हता व त्यांना पंचायत कार्यालय कोणत्या मजल्यावर चालते हे सुद्धा ठाऊक नव्हते यावरून डिकाॅस्‍ता किती कार्यक्षम आहेत हे कळून येते असे रानिया कार्दोज यांनी सांगितले. पंचायत मंडळाने कधीच विकासकामांसाठी आडकाठी आणली नाही उलट डिकाॅस्‍ता हेच आमच्या पंचायत क्षेत्रातील कामात अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT