Diabetes बदलत्या जीवनशैलीमुळे देशातील मधुमेह आणि हायपरटेन्शनचे रुग्ण वाढत चालले असून सध्या ११.४ टक्के लोकांना मधुमेह असून ३५.५ टक्के लोकांना हायपरटेन्शन आणि १५.३ टक्के लोकांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणे आढळून आली असल्याचे ‘दि लान्सेट डायबेटिस अँड एंडोक्रायनोलॉजी जर्नल’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनामध्ये म्हटले आहे.
देशातील मधुमेह आणि असंसर्गजन्य आजारांबाबतचे २०२१ मधील हे सर्वांत मोठे संशोधन आहे. मद्रास मधुमेह संशोधन फाउंडेशन आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या समन्वयाने आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने हे संशोधन करण्यात आले होते.
गोव्यात मधुमेहाचे रुग्ण अधिक
गोव्यात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २६.४ टक्के असून उत्तरप्रदेशात (४.८ टक्के) ते सर्वांत कमी आहे.
सिक्कीममध्ये (३१.३ टक्के) मधुमेहपूर्व लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून मिझोराममध्ये (६.८ टक्के) सर्वात कमी प्रमाण आहे. पंजाबमध्ये (५१.८ टक्के) उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे, तर रुग्णवाढीचा दर हा मेघालयमध्ये २४.३ टक्के आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.