Babush Monserrat: बाबूश, समर्थकांनी फोडलेल्‍या काचा न्‍यायालयासमोर सादर

पणजी पोलिस स्थानक तोडफोड प्रकरण: जप्‍त केलेल्‍या मुद्देमालाची ओळख पटवली
 Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

Babush Monserrat 2008 मध्‍ये विरोधी पक्षात असताना सध्‍याचे महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी पणजी पोलिस स्‍थानकावर येऊन जी नासधूस केली होती, त्‍याचा पाढा तपास अधिकारी सुदेश नाईक यांनी आज न्‍यायालयासमोर वाचला.

त्‍यावेळी ही नासधूस करण्‍यासाठी वापरलेले दगड, वाहनांच्‍या फुटलेल्‍या काचा आणि इतर अवशेष दक्षिण गोव्‍याचे प्रधान सत्र न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर पेश करण्‍यात आले.

या सुनावणीवेळी मंत्री मोन्‍सेरात आणि सहआरोपी असलेल्‍या त्‍यांच्‍या पत्‍नी जेनिफर मोन्‍सेरात यांच्‍यासह पणजीचे माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज हे गैरहजर होते.

 Babush Monserrate
Monsoon Update: नैऋत्य मोसमी पाऊस आज कर्नाटकात

19 फेब्रुवारी 2008 रोजी ही बहुचर्चित घटना घडली होती. त्‍यावेळी मोन्‍सेरात हे विरोधी पक्षात होते. एका मारामारीच्‍या प्रकरणात पोलिसांनी त्‍यांच्‍या समर्थकांना पकडले, पण विरोधी गटातील संशयितांना का पकडले नाही याचा जाब विचारण्‍यासाठी मोन्‍सेरात आपल्‍या समर्थकांसह पोलिस स्‍थानकावर चाल करून आले होते.

यावेळी त्‍यांनी प्रक्षोभक भाषण केल्‍याने खवळलेल्‍या जमावाने पोलिस स्‍थानकाची तोडफोड सुरू केली. त्‍यात काही पोलिस जखमी झाले होते.

दरम्‍यान, आज न्‍यायमूर्ती आगा यांच्‍यासमोर सध्‍याचे पंचायतमंत्री आणि माजी वीजमंत्री मॉविन गुदिन्‍हो यांचा समावेश असलेल्‍या कथित वीज बिल सवलत घोटाळ्‍याचीही सुनावणी होती. मात्र, उलट तपासणी करण्‍यासाठी वकिलांनी वेळ मागून घेतल्‍याने ही सुनावणी १६ जूनपर्यंत तहकूब करण्‍यात आली.

 Babush Monserrate
Budget: वेळेत निधी मिळत नाही!

सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब

या तोडफोडीत काही खासगी गाड्यांचे नुकसान झाले होते. त्‍यावेळी जप्‍त केलेल्‍या काही गाड्या मालकांनी न्‍यायालयाच्‍या परवानगीने घेऊन गेल्या, तर काही गाड्या भंगारात काढण्‍यात आल्‍या, असे पणजीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्‍याचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी आपल्‍या साक्षीत सांगितले. नाईक यांची साक्ष चालू असून आता 16 जूनला त्‍यांची पुढील साक्ष नोंदवून घेतली जाणार आहे.

 Babush Monserrate
Goa Board: नववी ते बारावीसाठी नवीन विषय समाविष्ट

बॅनर, फोटो, व्हीसीडी...

पणजीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्‍याचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी आज न्यायालयात त्‍यावेळी तोडफोड करताना जमावाने फेकलेल्‍या विटा, दगड, मोन्‍सेरात समर्थक घेऊन आलेले बॅनर, तोडफोड झालेल्‍या एका गाडीचा फोटो, जळालेल्‍या मोटारसायकल आणि सायकलीचे फोटो, खिडक्‍यांच्‍या फुटलेल्‍या काचांचे तुकडे तसेच त्‍यावेळी घेतलेल्‍या शुटींगची व्हीसीडी आदी मुद्देमालाची त्‍यांनी आज न्‍यायालयात ओळख पटवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com