COVID-19
COVID-19  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मार्चमध्ये कोरोनामुळे 11 मृत्यू

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मार्च महिन्यात 11 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. गोव्यात कोविडची पुष्टी झालेली 2,45,300 प्रकरणे आहेत, ज्यापैकी सध्या 29 सक्रिय प्रकरणे आहेत. आतापर्यंत 2,41,439 रुग्णांनी या प्राणघातक आजारावर मात केली आहे, तर 3,832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकारात्मक दर 2.02% असून 12 नवीन रुग्ण आढळले आहेत. (eleven deaths due to covid-19 in march in goa)

बीआयटीएस पिलानीमध्ये कोरोनाचा शिरकाव
झुआरीनगर येथील बीआयटीएस पिलानी (BITS Pilani) कॅम्पसमध्ये 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बहुतेक विद्यार्थी (Students) आहेत, तर उर्वरीत स्टाफ मेंबर आहेत. याबाबत बोलताना राज्य महामारी तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेटोडकर यांनी माहिती दिली की, खाजगी संस्थेत 25 मार्च रोजी कोविड-19 (COVID-19) चा पहिला रुग्ण आढळून आला होता. पुढे गुरुवारी 9 नवीन रुग्ण सापडले.

कोरोना निर्बंध हटवा
कोविडची लाट ओसरल्याने महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने राज्यातील निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. मास्क सक्तीही उठवण्यात आली आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही कोविडबाधितांची संख्या खूपच अत्यल्प बनल्यामुळे तसेच नवीन लाट येण्याची शक्यता नसल्यामुळे राज्यातही कोविड निर्बंध संपूर्णत: हटवण्याबाबत तज्ज्ञांचे एकमत आहे. राज्य सरकार आता कधी तज्ज्ञ समितीची बैठक बोलावते, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

निर्बंध हटवण्यासाठी केंद्राचे निर्देश आलेच आहेत; परंतु राज्य सरकारने आतल्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच पावले उचलायची आहेत. त्यानुसार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीची बैठक बोलावूनच निर्बंध हटवण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
- विश्‍वजित राणे, मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT