पर्येतील पाणी प्रश्न तात्काळ सोडवा!

दिव्या राणे यांचे निर्देश: पाणी, वीज समस्येचा आढावा
Water problem
Water problemDainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये: पर्ये मतदारसंघातील केरी, माऊस, ठाणे भागात पिण्याचे पाणी आणि विजेची समस्या वारंवार उदभवते. त्यावर तोडगा काढण्यासाठी पर्ये मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार डॉ. दिव्या राणे यांनी आज वाळपई येथे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्यांचा आढावा घेतला आणि या समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच डॉ. दिव्या राणे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या भागातील समस्या जाणून घेतल्या.

Water problem
आमदार वीरेश बोरकरांचा मंडूर पंचायत सचिवांना दणका

वाळपई येथे झालेल्या बैठकीत अंजुणे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता राम गावस, साहाय्यक अभियंता सतीश कुमार सावंत, दिलीप गावकर, ‘काडा’चे साहाय्यक अभियंता कमलाकांत माजिक, अनिल फडते, जलपुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता डी. तिवरेकर, साहाय्यक अभियंता सोमा नाईक, वीज खात्याचे अधिकारी तसेच केरीचे सरपंच दाऊद सय्यद आणि इतर पंचसदस्य उपस्थित होते.

हा विषय समजून घेतल्यावर डॉ. राणे यांनी केरीतील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना सुचवल्या. दिव्या राणे यांनी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः लक्ष देणार असल्याचे सांगितले. यावेळी ठाणे, माऊस पंचायत क्षेत्रातील पाणी, वीज समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

Water problem
‘गोवा माईल्स’वरून टॅक्सीचालक आमने-सामने

गढूळ पाण्याबाबत अभियंते हतबल

केरी पंचायत मंडळाने अंजुणे धरण प्रकल्प आमच्या गावात असूनही आम्हाला दूषित पाणी प्यावे लागते, याबाबत चिंता व्यक्त केली. यासंबंधी जलपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी केरीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाला अंजुणे धरणातून लोहयुक्त पाणी येत असल्याचे सांगितले. धरणातून येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात लोह आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्याची क्षमता प्रकल्पात नसल्याने ही समस्या सुटत नसल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com